शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्म घेणे हे पाप आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 03:06 IST2019-11-06T03:06:22+5:302019-11-06T03:06:37+5:30
कोठलीच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचा सवाल

शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्म घेणे हे पाप आहे का?
जितेंद्र गिरासे ।
सारंगखेडा (जि. जळगाव) : शहादा तालुक्यातील कोठली त.सा येथील प्रफुल्ल पाटील या शेतकºयाने रविवारी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती़ नापिकीतून आलेल्या नैराश्याने जीवनयात्रा संपवणाºया या शेतकºयाच्या शेताची आणि कुटुंबाचीही अवकाळीमुळे धूळधाण उडाली आहे़
मंगळवारी मयत प्रफुल्ल याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली़ त्याचे अंध वडील भेटणाºया प्रत्येकाला ‘शेतकºयाच्या पोटी जन्म घेणे’ पाप आहे का ? असा प्रश्न विचारुन आपले दु:ख मांडत होते़ मयत प्रफुल्ल पाटील यांच्या १० एकर क्षेत्रात ८० हजारांचा खर्च करुन मका पेरला होता़ गेल्या १० दिवसांपूर्वी तरारणाºया मक्यावर अवकाळी छाया पडली आणि होत्याचे नव्हते झाले. पीक गेल्याने त्यांची मनस्थिती खराब झाली होती़ तीन वर्षांपासून नापिकीचा फेरा पुन्हा समोर आल्याने त्यांनी जीवनयात्रा संपवली होती़ त्यांच्या शेतात आजघडीस मक्याचा सडका कडबा पडून आहे. मंगळवारी तलाठी कल्पना गिरासे व कृषी सहायक शितल सोनवणे या दोघांनी पंचनामा केला़
दरम्यान, कोठली शिवारातील बºयाच ठिकाणी अद्यापही पिकांमध्ये पाणी साचून असल्याचे चित्र आहे़ कापूस, सोयाबीन आणि मका या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे़ जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी नुकसानीची पाहणी केली़