लोखंडी पहारने तिजोरी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 15:28 IST2019-06-21T15:27:09+5:302019-06-21T15:28:33+5:30

भुसावळातील या धाडसी घरफोडीमुळे रहिवाशांमध्ये मोठी खबराट पसरली आहे. पोलिसांनी गस्त वाढविणे गरजेचे आहे.

Ironclad has broken the safe | लोखंडी पहारने तिजोरी फोडली

लोखंडी पहारने तिजोरी फोडली


xभुसावळ: वसंत टॉकीज मागील मेथाजी प्लॉट येथे बंद असलेल्या ब्रिटिशकालीन जुन्या बंगल्यात चोरट्यांनी दरोडा टाकून ३० हजार रोख, महत्त्वाचे दस्तावेज व भांडी चोरल्याची घटना २० रोजी सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली. यामुळे खळबळ उडाली. शहराच्या मध्यभागी वसंत टॉकीजच्या मागे मेथाजी प्लॉटमध्ये अशोकरॉय कुमुदचंद लायवाला व त्यांच्या पत्नी राजश्री लायवाला हे दोन महिन्यापासून सुरत येथे मुलांकडे गेले होते. दोन महिन्यांपासून बंद असलेल्या घरात २० रोजी नवजीवन एक्स्प्रेसने आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. चोरट्यांनी इमारतीला लागून असलेल्या पूर्वेकडील खुल्या जागेवरून गॅलरीला पांढऱ्या रंगाच्या वायरच्या सहाय्याने वरच्या मजल्यावर चढले. एकूण सहा खोल्या असलेल्या या बंगल्यात दोन खोल्या सोडून इतर चार खोल्यांमध्ये चोरट्यांनी नासधूस, फेकाफेक केली. घराच्या पूर्वेकडील गॅलरीत चढल्यानंतर स्वयंपाक घराच्या खिडकीचे ग्रील, लोखंडी जाळी व काचा फोडून आत प्रवेश केला. कडीकोयंडा तोडले. मध्यभागी असलेल्या खोलीमधील कपाटांची कुलूप तोडली. सामानाची नासधूस केली. याच खोलीतील जुन्या पद्धतीची तिजोरी लोखंडी पहारने तोडून त्यातील ३० हजार रुपये व महत्त्वेचे खरेदीखत, दस्तावेज लांबवले. जुनी नाणीही लांबवली. पितळाची भांडी लांबवली. लोखंडी पहार, चाकू, लोखंडी सळई अशा शस्त्रांचा वापर केल्याचे दृश्य होते.
दरम्यान, भुसावळातील या धाडसी घरफोडीमुळे रहिवाशांमध्ये मोठी खबराट पसरली आहे. पोलिसांनी गस्त वाढविणे गरजेचे आहे.
चोरट्यांचे लक्ष दस्तावेजांवर
आपल्याकडे २४ जून २०१७ मध्ये ही अशीच चोरी झाली होती,असे लायवाला यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान शहरांमध्ये दरोडे,लूटपाटीच्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान, लायवाला यांच्या घरातील तिजोरीतून चोरट्यांनी काही मालमत्तांचे दस्तावेज लांबविले आहेत.याचा अर्थ त्यांचे लक्ष दस्तावेज असावेत.

Web Title: Ironclad has broken the safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.