बँंकॉकहून आलेल्या युवकाची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:57 IST2020-03-22T12:56:34+5:302020-03-22T12:57:02+5:30
जळगाव : बॅकॉक येथून आलेल्या एका व्यक्तीची रामानंद नगर पोलिसांनी शनिवारी चौकशी करुन त्याचा जबाब लिहून घेतला. ही व्यक्ती ...

बँंकॉकहून आलेल्या युवकाची चौकशी
जळगाव : बॅकॉक येथून आलेल्या एका व्यक्तीची रामानंद नगर पोलिसांनी शनिवारी चौकशी करुन त्याचा जबाब लिहून घेतला. ही व्यक्ती १३ मार्च रोजी बॅकॉक येथून मुंबईत आली. तेथे विमानतळावर त्यांची कोरोनाबाबत तपासणी करण्यात आली. जळगाव शहरात आल्यानंतर त्यांनी ही माहिती कोणालाच दिली नव्हती.
रामानंद नगर पोलीस स्टेशनचे तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक व सध्या मेहुणबारे येथे कार्यरत असलेले सचिन बेंद्रे यांना शनिवारी एका व्यक्तीने फोन करुन गुप्त माहिती दिली. त्याआधारावर बेंद्रे यांनी रामानंद नगर पोलिसांशी संपर्क साधून ही माहिती कळविली. त्यानुसार रवींद्र चौधरी व नीलेश दंडगव्हाळ यांनी संबंधित व्यक्तीची घरी जावून भेट घेतली.
दुपारी ते पोलीस ठाण्यात हजर झाले. मुंबई विमानतळावर आपली कोरोनाची तपासणी झाली आहे व त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी स्टेशन डायरीला नोंद घेऊन त्यांना घरी जावू दिले. दुसऱ्या व्यक्तीबाबतची माहिती केली असता ते परदेशात जाणार आहेत, त्यामुळे त्यांची नोंद घेतली नाही.