शनिवारी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून, शेतकऱ्यांशी संवादही साधला.
चाळीसगावला अतिवृष्टीमुळे तितूर आणि डोंगरी या नद्यांना पूर आले. त्यात एक महिला वाहून गेली, तर शेतीसोबतच घरांचे व पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री भुसे यांनी आज सकाळी चाळीसगाव तालुक्यातील वाघडू, वाकडी, रोकडेशा आदि गावांना भेट देऊन तेथील पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर उपस्थित होते.
चौकट
भाजपचा ठिय्या, गाडीही रोखली
चाळीसगावकडे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येत असलेल्या मंत्री दादा भुसे यांची रोहिणी येथे गाडी अडविण्यासाठी ठिय्या दिला. यावेळी त्यांना निवेदनही देण्यात आले.
रोहिणी येथे रेल्वे भुयारी मार्गामध्ये पाणी तुंबल्यामुळे सात आठ गावांसह सभोवतालच्या पिंपळगाव, राजदेरे, राजदेहरे तुका तांडा, राहदेहरे, गावठाण तांडा, राजदेहरे सेटलमेंट, घोडेगाव, खराडी, शिंदी, जूनपणी,ओढरे, करजगाव, पाटणा आदी गावांचाही चाळीसगाव शहराशी संपर्क तुटला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दादा भुसे यांना रोहिणी रेल्वे गेट जवळ नेऊन सद्य:स्थिती दाखवण्यात आली. त्यांनी परस्थिती पाहून तत्काळ रेल्वे गेट खुले करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
१... ढगफुटी व निसर्गाचा प्रकोप होऊन झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून परिसरातील रोहिणी, हातगाव, अंधारी, तमगव्हान, पिंपळवाड, तळेगाव कृष्णातांडा करंजगाव, घोडेगाव, खराडी, पिंपळगाव जुनापाणी राजदेहरे सेटलमेंट तांडा म्हारवाडी इत्यादी गावांमध्ये पंचनामे करून सरसकट मदत मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी भाजपतर्फे करण्यात आली. यावेळी चाळीसगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल नागरे, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा सरचिटणीस नितीन सोनवणे, वाल्मीक नागरे, माजी सरपंच प्रकाश सांगळे, ज्ञानेश्वर बागुल, दीपक घुगे, विनोद चौधरी, घनश्याम डिघोळे, रामहरी ताठे, भावलाल नागरे उपस्थित होते.