बुद्धीमत्ता चाचणीने घेतली विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 12:44 IST2020-02-17T12:44:41+5:302020-02-17T12:44:49+5:30
जळगाव : पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी जिल्हाभरातील १८२ केंद्रावर घेण्यात आली़ बुद्धीमत्ता चाचणीतील प्रश्नांनी विद्यार्थ्यांची ...

बुद्धीमत्ता चाचणीने घेतली विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’
जळगाव : पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी जिल्हाभरातील १८२ केंद्रावर घेण्यात आली़ बुद्धीमत्ता चाचणीतील प्रश्नांनी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. अनेकांनी हे प्रश्न अवाक्याबाहेरचेच होते असे सांगितले़ शहरातील ११ केंद्रांवर ही परीक्षा शांततेत पार पडली़
पहिल्या पेपरला पाचवीचे १७५० विद्यार्थी गैरहजर होते़ १७४४८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली़ तर आठवीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ६२० विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली़ १२०२ विद्यार्थी परीक्षेला हजर होते़ दुसऱ्या पेपरला पुन्हा गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या वाढली होती़ पाचवीचे १७७२ तर आठवीचे ६२४ विद्यार्थी गैरहजर होते़ बुद्धीमत्तेचा पेपर अतिशय कठीण गेल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले़ दरम्यान, प्रश्नपत्रिकांमध्ये चुका असल्याची माहिती समोर येत होती मात्र, असा कुठलाही प्रकार नसल्याचे संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले़ शहरातील भगीरथ, ला.ना., अँग्लो उर्दू, प्रगती विद्यालय, केसीई सोसायटी, नंदिनीबाई विद्यालय, मिल्लत हायस्कूलमध्ये ही परीक्षा झाली.
१७ प्रभागात परीक्षा... १५ तालुक्यांसह भुसावळ व जळगाव शहर स्वतंत्र अशा १७ प्रभागात ही परीक्षा घेण्यात आली़ गैरप्रकार होऊ नये म्हणून या परीक्षेसाठी १७ अधिकाºयांची भरारी पथकात नियुक्ती करण्यात आली होती़ शिक्षणाधिकारी बी़ जे़ पाटील यांच्या नियंत्रणाखाली ही परीक्षा झाली़ यात निरंतर शिक्षणाअधिकारीवाय़ पी़ निकम, उपशिक्षणाधिकारी एस़ एस़ चौधरी, उपशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, शिक्षणविस्तार अधिकारी विजय पवार, शिक्षणविस्तार अधिकारी राजेंद्र सपकाळे आदींनी तालुक्यांमध्ये परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली़