अटलजींच्या निधनामुळे प्रेरणादायी नेतृत्व हरपले- माजी खासदार वाय.जी.महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:46 IST2018-08-16T20:45:07+5:302018-08-16T20:46:49+5:30
देशाचे चांगले व्यक्तिमत्त्व, वाकपटू व दिशादर्शक खरा नेता व माझे प्रेरणास्थान माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी गेल्याचे मोठे दु:ख आहे अशी प्रतिक्रिया माजी खासदार वाय.जी.महाजन यांनी व्यक्त केली.

अटलजींच्या निधनामुळे प्रेरणादायी नेतृत्व हरपले- माजी खासदार वाय.जी.महाजन
जळगाव : देशाचे चांगले व्यक्तिमत्त्व, वाकपटू व दिशादर्शक खरा नेता व माझे प्रेरणास्थान माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी गेल्याचे मोठे दु:ख आहे अशी प्रतिक्रिया माजी खासदार वाय.जी.महाजन यांनी व्यक्त केली.
अटलजींकडून मला अनेक प्रेरणादायी नेतृत्व, दिशादर्शक तत्त्वांची शिकवण मिळाली. खासदार असताना अनेकदा त्यांच्याशी चर्चा होत असे. त्यांच्या निधनामुळे मला मोठे दु:ख झाले आहे. त्यांच्या आठवणींचे स्मरण कायम राहणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
मराठी संस्कृती, मराठी नाटक, मराठी साहित्य आणि मराठी इतिहास यावर अटलबिहारी वाजपेयी यांचे विलक्षण प्रेम होते. त्यावेळी आपण त्यांना ‘झुंज’ ही कादंबरी भेट दिली असल्याचे शिवचरित्र अभ्यासक दादा नेवे यांनी सांगितले.