निरीक्षकांच्या दालनात वाळूमाफियाचा वाढदिवस साजरा करणारे दोन पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:32 IST2019-04-13T22:31:28+5:302019-04-13T22:32:42+5:30
शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या दालनात वाळूमाफियाचा वाढदिवस साजरा करणारे दोन्ही कर्मचारी व निरीक्षकांना भोवले आहे. विनोद संतोष चौधरी व रवींद्र विठ्ठल जाधव या दोन्ही वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांना पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी निलंबित केले आहे.

निरीक्षकांच्या दालनात वाळूमाफियाचा वाढदिवस साजरा करणारे दोन पोलीस निलंबित
जळगाव : शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या दालनात वाळूमाफियाचा वाढदिवस साजरा करणारे दोन्ही कर्मचारी व निरीक्षकांना भोवले आहे. विनोद संतोष चौधरी व रवींद्र विठ्ठल जाधव या दोन्ही वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांना पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी निलंबित केले आहे.
ममुराबाद रस्त्यावर वास्तव्याला असलेल्या वाळूमाफियाचा गेल्या आठवड्यात वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर यांच्या दालनाता साजरा करण्यात आला. त्याच दिवशी वाहतूक शाखेत कार्यरत असलेला चालक रवींद्र जाधव याचाही वाढदिवस होता. या दोघांच्या वाढदिवसानिमित्त निरीक्षकांच्या दालनात केक कापण्यात आला.दरम्यान, वाळूमाफिया व पोलीस यांच्यातील संबंध या प्रकरणामुळे पुन्हा एकदा उघड झाले.
काय म्हटले आहे आदेशात
डबर, खडी व इतर व्यवसायात कार्यरत असलेल्या खासगी व्यक्तीचा वाढदिवस निरीक्षकांच्या दालनात साजरा करणे शिस्तीला धरुन नाही. या प्रकारामुळे वृत्तपत्रातही बातम्या प्रसारीत झाल्याने पोलीस दलाची बदनामी झाली. विनोद चौधरी यांनी या खासगी व्यक्तीला मानलेला मावसभाऊ म्हटले आहे. त्यांनी केक आणण्याची व्यवस्था केली. बेशिस्तपणामुळे चौधरी व जाधव यांना निलंबित करण्यात येत असून निलंबन काळात पोलीस मुख्यालय हे मुख्यालय देण्यात आले आहे.
आठ दिवसात सात जणांविरुध्द कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी गेल्या आठवड्यात पाच पोलिसांवर कारवाई केली. त्यात बाजार पेठ पोलीस स्टेशनचे योगेश माळी, शशिकांत तायडे व मुख्यालयातील कुणाल सोनवणे यांना निलंबित तर शनी पेठचे अनिल धांडे व रवींद्र गुरचळ या दोघांना मुख्यालयात जमा केले होते. आता विनोद चौधरी व रवींद्र जाधव यांची भर पडली आहे. आठ दिवसात सात जणांवर कारवाईची कुºहाड कोसळली आहे.