शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

निरीक्षकांचे प्रमाणपत्र बोगस

By admin | Updated: July 3, 2014 15:02 IST

विविध कारणांनी गाजणार्‍या मनपाच्या आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षकांचे पात्रतेचे प्रमाणपत्रच बोगस विद्यापीठांचे तर काहींनी बनावट प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले आहे.

जळगाव : विविध कारणांनी गाजणार्‍या मनपाच्या आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षकांचे पात्रतेचे प्रमाणपत्रच बोगस विद्यापीठांचे तर काहींनी बनावट प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी उपायुक्त गांगोडे यांनी आस्थापना विभागाला चौकशीचे आदेश दिले असून त्यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. 
मनपातील आरोग्य विभाग नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी गाजत असतो. तसेच मनपातील कर्मचारी भरतीही नेहमीच बेकायदेशीर प्रक्रिया, बेकायदेशीर पदोन्नतीसाठी गाजत असते. आता त्यात आरोग्य निरीक्षकांच्या नियमानुसार मान्यता नसलेल्या बोगस विद्यापीठाच्या प्रमाणपत्रांच्या आधारे पदोन्नती मिळविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अखिल भारतील सफाई मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांनी माहितीच्या अधिकारात या प्रमाणपत्रांबाबतची माहिती मागितली होती. त्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. मनपा आरोग्य विभागात १७ आरोग्य निरीक्षक (सॅनीटरी इन्सपेक्टर) आहेत. यापैकी बहुतांश कर्मचारी हे मजूर, कुली, सफाई कामगार या पदावरून पदोन्नती मिळवून आले आहेत. त्यांनी पदोन्नती मिळविण्यासाठी या बोगस विद्यापीठाच्या पदव्यांचा वापर केल्याचे आढळून आले आहे. त्याच्या आधारे पदोन्नती मिळवून २५ हजारांच्या आसपास पगार घेत आहेत. ही फसवणूक असून जनतेच्या पैशांची लूट असल्याचा आरोप होत आहे. 
 
आरोग्य निरीक्षकांनी बोगस विद्यापीठाचे अथवा बनावट प्रमाणपत्र सादर करून आरोग्य निरीक्षक पदावर पदोन्नती मिळविली असल्याबाबतची लेखी तक्रार प्राप्त झाली आहे. त्याबाबत आस्थापना विभागाकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यात कुणी दोषी आढळल्यास संबंधीतांवर कारवाई केली जाईल. -अविनाश गांगोडे, उपायुक्त, मनपा 
 
अनेक प्रमाणपत्र बोगस विद्यापीठाचे तर काही बनावट आहेत. याबाबत मनपा उपायुक्त अविनाश गांगोडे यांना भेटून त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यांनी याबाबत आस्थापना विभागाकडे विचारणा केली आहे. काही चुकीचे आढळल्यास या आरोग्य निरीक्षकांना पदावनत केले जाईल, असे आश्‍वासन दिले आहे. - अजय घेंगट, जिल्हाध्यक्ष, सफाई मजदूर संघ