पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना हृदयविकाराचा झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 16:47 IST2018-12-19T16:44:45+5:302018-12-19T16:47:25+5:30
मलकापूर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले निरीक्षक प्रदीप खंडू ठाकूर यांना सोमवारी पोलीस ठाण्यातच हृदयविकाराचा झटका आला.

पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना हृदयविकाराचा झटका
जळगाव : मलकापूर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले निरीक्षक प्रदीप खंडू ठाकूर यांना सोमवारी पोलीस ठाण्यातच हृदयविकाराचा झटका आला. अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे व उपअधीक्षक गिरीश बोबडे यांच्याकडून सतत छळ होत असल्यानेच त्या तणावात हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप ठाकूर यांच्या पत्नी ज्योती ठाकूर यांनी केला. सोमवारी छातीत कळा येऊन त्यांना चक्कर आले होते. मलकापूरात प्राथमिक उपचार केल्यानंतर ठाकूर यांना रात्री जळगावातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पत्नी ज्योती यांनी दिली.
ठाकूर यांना कोणताच त्रास दिला नाही. ते पोलीस स्टेशनला थांबतच नाहीत. घरुनच कामकाज पाहतात. त्याचा परिणाम कामावर होत होता. त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
-गिरीश बोबडे, पोलीस उपअधीक्षक, मलकापूर