मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांकडून भुसावळ येथे पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 16:34 IST2021-01-02T16:33:48+5:302021-01-02T16:34:04+5:30

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी शनिवारी भुसावळ येथे  भेट दिली.

Inspection at Bhusawal by Central Railway General Manager | मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांकडून भुसावळ येथे पाहणी

मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांकडून भुसावळ येथे पाहणी

भुसावळ : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी शनिवारी भुसावळ येथे  भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी डी.आर.एम. कार्यालयातील विविध विभागांची पाहणी केली. 
सुरुवातीला नियंत्रण कक्षाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर केंद्रीयकृत निगराणी कक्ष (सीसीटीव्ही कक्ष) येथे भेट दिली. मेमू दोष निवारण पुस्तिका, विविध विभागातील नियंत्रण कक्षांची पाहणी केल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अनावरण करण्यात आले. सिग्नल व टेलिकॉम विभागाला १० हजार रुपयांचा पुरस्कार त्यांनी घोषित केला. तसेच मध्य रेल्वे महिला कल्याण  संगठन भुसावल मंडलद्वारा रेल्वे हॉस्पिटलसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण  मध्य रेल्वे महिला कल्याण  संगठन मुख्यालय अध्यक्षा मित्तल  यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मंडळ रेल प्रबंधक विवेककुमार गुप्ता, अपर मंडळ रेल प्रबंधक मनोजकुमार सिन्हा, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज आर.पाटील, वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक आर.के.शर्मा, वरिष्ठ मंडल गृह प्रबंधन इंजिनियर लक्ष्मीनारायण, मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितिज गुरव, सर्व शाखांचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तसेच रेलवे हॉस्पिटल मध्ये मुख्य चिकित्सा अधीक्षक सामंतराय, मध्य रेल्वे  महिला संघटन भुसावळ मंडळ अध्यक्ष नीता गुप्ता, उपाध्यक्ष रजनी सिन्हा, सेक्रेटरी मोनिका चिखले, कोषाध्यक्ष प्रिया कदम उपस्थित होते. 

Web Title: Inspection at Bhusawal by Central Railway General Manager