जळगावात मनसेतर्फे स्वदेशी साखर वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 16:59 IST2018-05-16T16:59:27+5:302018-05-16T16:59:27+5:30
पाकिस्तानमधून साखर आयात केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वदेशी साखरेची वाटप करण्यात आली.

जळगावात मनसेतर्फे स्वदेशी साखर वाटप
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१६ : देशातील साखर कारखानदारांकडून उत्पादित केलेली साखर उपलब्ध असताना पाकिस्तानमधून साखर आयात केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वदेशी साखरेची वाटप करण्यात आली.
शासनाने शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमधून साखर आयात केली आहे. यामागे साखर उत्पादक शेतकऱ्यांचे व कारखानदारांचे कंबरडे मोडण्याचा डाव आहे. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. त्यातच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यातच शासनाच्या या कृतीमुळे शेतकरी बेजार झाला आहे. यासाºयाचा निषेध म्हणून मनसेतर्फे स्वदेशी साखरचे वाटप करण्यात आले.
यावेळी ‘स्वदेशी साखर वापरा, शेतकरी वाचवा’, नाही खाणार नाही खाणार पाकिस्तानची साखर नाही खाणार’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अॅड.जयप्रकाश बाविस्कर, जिल्हा सचिव अॅड.जमिल देशपांडे, महानगराध्यक्ष विरेश पाटील, मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, महानगर सचिव अविनाश पाटील, उपशहराध्यक्ष संदीप पाटील, रज्जाक सैयद, सलीम कुरेशी, विभागीय अध्यक्ष संदीप मांडोळे, हेमंत बोरणारे, मतीन पटेल, इमाम पिंजारी, किरण देशमुख, गजानन पाटील, सद्दाम तडवी, नंदू महाजन, अन्वर मिस्त्री, कमलाकर निकम, याकुब भिस्ती, दीपक कैकाळी, सलीम शेख उपस्थित होते.