शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बहुआयामी महासत्ता होण्याची भारताची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 21:19 IST

डॉ. ज्ञानेश्वर मुळे : स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त व्याख्यान

जळगाव : बहुआयामी महासत्ता होण्याची भारताची क्षमता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि माजी सनदी अधिकारी व राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ह्यमहासत्ता भारत : वर्तमान कि भविष्यह्ण या विषयावर व्याख्यान पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. मुळे पुढे म्हणाले की, भारत इतिहासातील एक महासत्ताच होता. केवळ आर्थिकच नव्हे तर जीवनाच्या विविध क्षेत्रांत भारतीयांचे प्रभावी योगदान राहिले आहे. सद्य:स्‍थितीत भारतीयांच्या कर्तृत्वाचा प्रभाव जगातील विविध देशांमध्ये दिसून येतो. क्षेत्रफळ, लोकसंख्या, सामाजिक सक्षमता या सर्व आपल्या जमेच्या बाजू आहेत. भारतीय संविधान आपणास महासत्ता कसे बनायचे, याचे मार्गदर्शनही करते. स्वतंत्रता, समता, न्याय व सुशासन या चतु:सूचीच्या आधारे भारतास वाटचाल करत राहावी लागेल, असे त्यांनी सांगितले.युवक वर्ग जागृत झाला पाहिजेअध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू प्रा. पी.पी. माहुलीकर यांनी सांगितले की, भारतास जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर सर्वोतपरी प्रयत्न होणे गरजेचे असून त्यासाठी देशातील जनता व युवक वर्ग जागृत झाला पाहिजे. तसेच शैक्षणिक क्षेत्रासोबत विविध संशोधन करून जास्तीत जास्त पेटंट मिळविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, तरच देश येणाऱ्या काळात जागतिक महासत्ता बनू शकतो. प्रास्ताविक विभागाचे प्रभारी संचालक डॉ. मनीष जोशी यांनी यांनी केले, तर सूत्रसंचालन श्याम महाजन यांनी केले. परिचय विद्यार्थिनी शुभांगी केदार हिने केला, तर आभार सुभाष पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश जडे व समाधान अहिरे यांनी परिश्रम घेतले.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव