शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांवर स्वातंत्र्य दिन, मंत्रिमंडळ विस्तार नाही, ध्वजारोहण कुणाच्या हस्ते? आठवडाभरात पालकमंत्री मिळणार?

By विजय.सैतवाल | Updated: August 7, 2022 18:40 IST

Jalgaon News: प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान असलेल्या स्वातंत्र्य दिनाचा यंदा अमृत महोत्सव साजरा होत असताना घरोघरी तिरंगा फडकणार आहे. मात्र दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्रीदेखील मिळालेले नाहीत.

- विजयकुमार सैतवाल जळगाव : प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान असलेल्या स्वातंत्र्य दिनाचा यंदा अमृत महोत्सव साजरा होत असताना घरोघरी तिरंगा फडकणार आहे. मात्र दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्रीदेखील मिळालेले नाही. त्यामुळे आठ दिवसांवर आलेल्या स्वातंत्र्यदिनापर्यंत पालकमंत्री नियुक्ती होऊन त्यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल की जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते हे ध्वजारोहण होईल, याकडे सर्वांचे लक्ष लाले आहे.

गेल्या दीड महिन्यात राज्यातील सत्ता समीकरणे बदलले असून महाविकास आघाडीत असलेलेच आमदार आता युती सरकारमध्ये आहे. मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असे दोनच मंत्र्यांवर राज्याचा कारभार सुरू असून मंत्रिमंडळ विस्ताराची शिंदे गटात गेलेल्या आमदारांसह भाजप आमदारांनाही प्रतीक्षा आहे. त्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जिल्ह्यांना पालकमंत्रीदेखील मिळालेले नसल्याने आठवडाभरावर आलेल्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोणाच्याहस्ते होणार, याचीही अनेकांना उत्सुकता आहे.

निर्णय लांबणीवरमंत्रिमंडळ विस्तार प्रत्येक वेळी लांबत आहे. न्यायालयात शिवसेना व शिंदे सेनेचा लढा सुरू असल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबविला जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यात आता हा न्यायालयीन लढादेखील १२ ऑगस्टपर्यंत लांबला आहे. त्यामुळे त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल व १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे यंदाचे ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्याहस्ते होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हा आहे पर्यायपालकमंत्री नियुक्त असतानादेखील स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन या दिवशी ते प्रकृती अस्वास्थ अथवा इतर कोणत्याही कारणाने ध्वजारोहणासाठी पोहचू शकले नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते ध्वजारोहण केले जाते. त्यानुसार सध्या पालकमंत्री नसले तरी व १५ ऑगस्टपर्यंत काही निर्णय न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते ध्वजारोहण होऊ शकते.

आठवडाभरात निर्णयाची शक्यता?मंत्रिमंडळ विस्तार होत नसला तरी व स्वातंत्र्यदिनापर्यंत तो झाला नाही तरी स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण होण्यासाठी राज्य सरकारकडून निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती वरिष्ट पातळीवरून मिळाली. आठवडाभरात कोणता तरी निर्णय होणारच असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारIndependence Dayस्वातंत्र्य दिनJalgaonजळगाव