शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

‘रुपया’ वाढवितोय सुवर्णनगरीची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 11:53 AM

रुपयात घसरण तरी चांदीचे भाव गडगडताहेत

विजयकुमार सैतवालजळगाव : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण सुरूच असल्याने व इंधनाचे दर वाढण्यासह सोन्याच्या भावावरही परिणाम होत असल्याने ‘रुपया’ सुवर्णनगरी जळगावातील मोठा व्यवसाय असलेल्या सराफ व्यवसायात चिंता वाढवित आहे. २२ दिवसात सोन्याच्या भावात तब्बल १२०० रुपयांनी वाढ झाली व सोने पुन्हा ३१ हजारावर गेले. भावातील या सततच्या चढ-उतारामुळे सुवर्ण व्यवसायात अस्थिरता निर्माण होत आहे.रुपयांचे अवमूल्यन, जागतिक पातळीवर विविध देशांमधील वाद, नैसर्गिक आपत्ती, इंधनाचे दर या सर्व घटकांचा सोन्याच्या भावावर मोठा परिणाम होत असतो. त्यात आता तर रुपयाचे सलग दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवमूल्यन सुरू आहे. यामुळे इंधनाचे दर कधी नव्हे एवढ्या उच्चांकीवर पोहचले असून त्याचा सर्वांनाच फटका बसत आहे. सोबतच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाल्यास सोन्याच्या दरात वाढ होते. यास जुलै व आॅगस्ट महिना अपवाद ठरला. त्या वेळी अमेरिकेतच सोन्याला मागणी कमी झाल्याने रुपयाचे अवमूल्यन झाले तरी सोन्यात घसरण होऊन ते ३० हजार रुपयांच्या खाली गेले होते. मात्र आता अमेरिकेतील सोने बाजारात उलाढाल वाढल्याने सोन्याचे भाव पुन्हा वाढले. त्यात अमेरिकन डॉलरचे दर ७२.१० रुपये झाल्याने सोन्याच्या भाववाढीस मदत होत आहे.चढ-उताराने चिंतानवीन वर्षाच्या सुरुवातीलाच १ जानेवारी २०१८ रोजी सोन्याच्या २९ हजार ९०० रुपयांच्या भावासह सराफ बाजारातील व्यवहारास सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र सोन्याच्या भाववाढीस सुरुवात होऊन सोन्याने ३० हजाराचा पल्ला गाठला. त्यानंतर ही वाढ कायम राहत लग्नसराईमध्ये सोने ३१ हजाराच्या पुढे गेले. मात्र जुलै महिन्यापासून यात घसरण होत जाऊन १७ आॅगस्ट रोजी ते ३० हजाराच्या खाली आले होते. त्या दिवशी डॉलरचे मूल्य ६९.३० रुपयांवर होते त्या वेळी सोने २९ हजार ९०० रुपयांवर होते. मात्र डॉलरचे दर हळूहळू वाढत जाऊन ते ९ सप्टेंबर रोजी ७२.१० रुपयांवर पोहचले त्या वेळी सोन्याचे दर ३१ हजार रुपये झाले. डॉलरचे दर केवळ २.४० रुपयांनी वाढले तरी भारतात सोने १२०० रुपयांनी वाढल्याने रुपयांच्या अवमूल्यनाचा किती मोठा परिणाम होत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे सर्वच व्यापारी चिंतीत आहे.१७ आॅगस्ट रोजी २९ हजार ९०० रुपयांवर असलेल्या सोन्यात हळूहळू वाढ होत जाऊन ते २२ आॅगस्ट रोजी ३० हजार २०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर २५ आॅगस्ट रोजी ३० हजार ४०० रुपये अशी २०० रुपयांची वाढ झाली. ३० आॅगस्ट रोजी सोने ३० हजार ८०० रुपयांवर पोहचून ७ सप्टेंबर रोजी ३१ हजाराचा पल्ला गाठला. त्यानंतर पुन्हा १०० रुपयांनी चढ-उतार कायम असल्याचे सुवर्ण बाजारात चित्र आहे.रुपयात घसरण तरी चांदीचे भाव गडगडताहेतएकीकडे सोन्याच्या भावात वाढ होत असली तरी दुसरीकडे मागणी नसल्याने चांदीच्या भावात घसरण होत आहे. ६ सप्टेंबर रोजी ३९ हजार ५०० रुपये प्रती किलोवर असलेल्या चांदीच्या भावात एकाच दिवसात ५०० रुपयांची घसरण होऊन ती ३९ हजारावर आली. गेल्या महिन्यातही चांदीच्या भावात अशीच घसरण झाली होती. १७ आॅगस्ट रोजी ३९ हजार ५०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात ५०० रुपयांची घसरण होऊन ती १८ आॅगस्ट रोजी ३९ हजारावर आली. त्यानंतर २५ आॅगस्ट रोजी ५०० रुपये प्रती किलोने वाढ होऊन चांदी पुन्हा ३९ हजार ५०० रुपयांवर पोहचली होती. मात्र आता पुन्हा घसरण झाली आहे. रुपयाच्या घसरणीने सोन्याचे भाव वाढत आहे तर दुसरीकडे चांदी गडगडत असल्याने हे गणित न उमजणारे असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :GoldसोनंJalgaonजळगाव