शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
10
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
11
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
12
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
13
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
14
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
15
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
16
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
17
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
18
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

तालुका पातळीवरही वाढीव बेड - पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना महामारीत जिल्हावासियांसाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना महामारीत जिल्हावासियांसाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढली तरी मोहाडी येथील रूग्णालयात उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक तालुका पातळीवर देखील रूग्णांना वाढीव बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. याचा रूग्णांना लाभ होणार असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्री पाटील यांनी कॅबिनेट बैठकीत जिल्ह्यातील स्थितीचा आढावा सादर केला. यासोबत पाटील हे मंत्रीमंडळाच्या बैठकीत जळगाव येथून सहभागी झाले. यात त्यांनी जिल्ह्यात नव्या निर्बंधांचे पालन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाची कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत महत्वाची बैठक घेतली. यात जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती. यात पालकमंत्र्यांनी कोविड रुग्णांना दिल्या जाणार्‍या उपचारांबाबत सूचना दिल्यात. रुग्णांना ऑक्सीजन पुरवठा गरजेनुसार करणेबाबत निर्देश दिले.

जिल्हा प्रशासनाच्या बेड मॅनेजमेंट सिस्टीममुळे रूग्णांना लाभ होत असून याच प्रकारे रेमडेसिविरचा अचूक पुरवठा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

राम नवमी, हनुमान जयंती साधेपणाने साजरे करा

राज्य शासनाने कडक लॉकडाऊनचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी या बंदचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. तर जिल्ह्यातील नागरिकांनी रामनवमी आणि हनुमान जयंती हे उत्सव अतिशय साधेपणाने साजरे करावेत असे आवाहन देखील त्यांनी केले.