आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२६ : मनपाची मासिक दुकान फी तसेच कोळसा व वीज युनीटमध्ये दरवाढ झाल्याने इस्त्रीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय जळगाव जिल्हा लॉण्ड्री व्यावसायिक असोसिएशनच्या कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला.जळगाव जिल्हा धोबी सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण शिरसाठे यांच्या अध्यक्षतेखाली व असोसिएशनचे अध्यक्ष अरुण राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली. महानगरपालिकेची मासिक दुकान फी दुप्पट झाल्याने तसेच कोळसा व वीज वितरण कंपनीने दरवाढ केल्याने इस्त्रीच्या दरवाढीचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यामुळे आता नवीन दरानुसार साधा ड्रेस १५ रुपये, कॉटन ड्रेस २० रुपये, स्टार्च ड्रेस-४०, साडी ३०, शालू ५०, साडी ड्रायक्लिनींग १५०, शालू ड्रायक्लिनींग २००, कांजी ड्रायक्लिनींग १००, थ्री-पीस ड्रायक्लिनींग १००, कोट ड्रायक्लिनींग १००, ड्रेस धुलाई व प्रेस ४० रुपये असे नवीन दर असणार आहेत.या दरापेक्षा कमी दर घेणाºया व्यावसायिकास असोसिएशनतर्फे दंड करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी जिल्हा लॉण्ड्री व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती अध्यक्ष अरुण राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
जळगाव शहरात लॉण्ड्री दरात होणार वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 18:51 IST
जळगाव जिल्हा लॉण्ड्री व्यावसायिक असोसिएशनच्या सभेत निर्णय
जळगाव शहरात लॉण्ड्री दरात होणार वाढ
ठळक मुद्देकमी दर घेणाºया व्यावसायिकास होणार दंडजिल्हा लॉण्ड्री व्यावसायिक असोसिएशनच्या कार्यकारिणीची बैठकमनपाची मासिक दुकान फी तसेच कोळसा व वीज युनीटमध्ये दरवाढ झाल्याने घेतला निर्णय