संतप्त शेतकऱ्यांचा जळगावात कार्यकारी अभियंत्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 21:09 IST2018-06-13T21:09:56+5:302018-06-13T21:09:56+5:30
जळगाव तालुक्यातील कानळदा फिडरवरील फुपनगरी, वडनगरी शिवारातील कृषिपंपांचा वीजपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून खंडित असल्याने संतप्त २० ते २५ शेतकºयांनी बुधवारी दुपारी ४ वाजता महावितरणच्या शहर (प्रादेशिक) कार्यालयावर धडक मोर्चा नेत कार्यकारी अभियंता संजय तडवी यांना घेराव घातला़

संतप्त शेतकऱ्यांचा जळगावात कार्यकारी अभियंत्यांना घेराव
जळगाव- तालुक्यातील कानळदा फिडरवरील फुपनगरी, वडनगरी शिवारातील कृषिपंपांचा वीजपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून खंडित असल्याने संतप्त २० ते २५ शेतकºयांनी बुधवारी दुपारी ४ वाजता महावितरणच्या शहर (प्रादेशिक) कार्यालयावर धडक मोर्चा नेत कार्यकारी अभियंता संजय तडवी यांना घेराव घातला़ शेतकºयांचे म्हणणे एकून घेत तडवी यांनी त्वरीत संबंधित कर्मचाºयास वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले़
काही दिवसांपूर्वी जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे फुपनगरी व वडनगरी येथील शेतकºयांनी कापसाची लागवड केली आहे़ मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे शेतकºयांनी कृषिपंप सुरू केले़ त्यानंतर वीजपुरवठा खंडित होता़ यातच गेल्या तीन दिवसांपासून फुपनगरी व वडीनगरी शिवारातील शेतांमधील वीज पुरवठा खंडित झाला़ अन् तीन दिवस उलटून सुध्दा खंडित वीज सुरळीत न झाल्याने स्थानिक शेतकºयांनी संबंधित वीज कर्मचाºयांना याबाबत विचारणा केली़ पण कर्मचाºयांकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळत होती़ कर्मचाºयांकडून काहीही हालचाली होत नसल्यामुळे शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली.