भुसावळात इनरव्हील क्लबतर्फे विसावा बागेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 17:57 IST2021-01-14T17:57:12+5:302021-01-14T17:57:54+5:30
इनरव्हील क्लबतर्फे विसावा बागेचे उद्घाटन करण्यात आले.

भुसावळात इनरव्हील क्लबतर्फे विसावा बागेचे उद्घाटन
भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत माऊली नगरात इनरव्हील विसावा बागेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
याप्रसंगी रजनी संजय सावकारे, डिस्ट्रिक्ट चेअरमन मीनल लाठी, डॉ.रश्मी शर्मा, क्लब अध्यक्ष शीतल भराडे, राखी भराडे, अनिता खंडेलवाल, नोयना टेकवाणी, मनीषा तायडे, नूतन फालक यांची उपस्थिती होती. वृक्षमित्र प्रमोद शुक्ला यांचे सहकार्य लाभले.
रोटरी हॉलमध्ये विविध कार्यक्रम पार पडले. गणेशवंदना एन्जल क्लबच्या सदस्य राधिका मंत्री, प्रेरणा मंडोरे, खुशबू भराडिया, खुशी मंत्री, दिव्या भराडिया यांनी सादर केली. स्वागत गीत वीणा लाहोटी, शशिकला लाहोटी व राधिका लाहोटी यांनी सादर केले.
प्रसंगी डॉ.रश्मी शर्मा यांना ऑनर्ड अॅक्टीव मेंबर म्हणून सन्मानित करण्यात आले. क्लबच्या रत्नकांता अग्रवाल यांचे मीनल मराठे यांनी स्वागत केले.
डिस्ट्रिक्ट चेअरमन मीनल, पीडीसी रत्नकांतजी आगरवाल, रश्मी शर्मा, शीतल भराडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेस्थानकावर दोन वेडींग मशीन देण्यात आल्या. तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये धूम्रपान विरोधी पोस्टर लावण्यात आले. मोहिनी हिला एज्युकेशन किट व मोबाईल देण्यात आला. तसेच गरजू १५ विद्यार्थिनींना वह्या तसेच पेन्सील तसेच १५ गरजूंना उबदार कपडे वाटप करण्यात आले. प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी दोन हजार कापडी पिशव्या तयार करून वाटप करण्याचा संकल्प केला.
उपक्रम यशस्वीतेसाठी कांचन जोशी, मनीषा तायडे, राखी भराडे, शशिकला लाहोटी, सुनंदा भारुडे, जयश्री दवे, क्लब सचिव रुचिका शर्मा, उपाध्यक्षा वंदिता पारे, माजी अध्यक्ष स्वाती देव, राजेश्री कात्यायनी, सविता शुक्ला, अलका भाटकर व क्लब सदस्यांनी परिश्रम घेतले.