अमळनेर रेल्वे स्टेशनवर जनरल मॅनेजरकडून विविध आधुनिक मशिनरीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 16:07 IST2021-02-02T16:06:12+5:302021-02-02T16:07:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अलोक बंसल यांचे दि २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अमळनेरात ...

अमळनेर रेल्वे स्टेशनवर जनरल मॅनेजरकडून विविध आधुनिक मशिनरीचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अलोक बंसल यांचे दि २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अमळनेरात आगमन झाले. १२ डब्यांच्या विशेष तपासणी रेल्वेने सुमारे १५० अधिकारी कर्मचारीवर्गाच्या पथकाने रेल्वे स्टेशन परिसरातील कामाचा व रेल्वे स्टेशन विभागाच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला, तर विविध अत्याधुनिक मशिनरीचे उद्घाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले.
धरणगावमार्गे येताना चोपडा रेल्वे गेटजवळ रेल्वे रूळाची व इतर कामांची पाहणी करून त्यानंतर पायी तांबेपुरा रेल्वे बोगद्याजवळ पाहणी केली. याठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनादेखील दिल्या. अमळनेर रेल्वे स्टेशनअंतर्गत तयार करण्यात आलेल्या उधना जळगाव रेल्वे खंडाच्या गँगटूल रूमचे व सिनियर सेक्शन इंजिनिअर कक्षातील मशिनरीचे उद्घाटन त्यांनी केले. या ठिकाणाहून रेल्वे तापमान आणि टेलिमेट्री डिवाईनचे कामकाज पाहिले जाणार आहे.
ते धरणगावमार्गे स्वतंत्र रेल्वेने अमळनेरला तपासणीकरिता येणार असल्याने या विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी तैनात होते. त्यांच्या आगमनापूर्वीच रेल्वेस्टेशनच्या सफाईकरिता लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. यावेळी प्रवासी संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.