चोपड्यात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस सप्ताहाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST2021-09-12T04:20:07+5:302021-09-12T04:20:07+5:30

चोपडा : पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आयोजित ...

Inauguration of International Literacy Day Week in Chopda | चोपड्यात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस सप्ताहाचे उद्घाटन

चोपड्यात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस सप्ताहाचे उद्घाटन

चोपडा : पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आयोजित आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाचे ८ सप्टेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले.

गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील केंद्रप्रमुख अशोक साळुंखे, नरेंद्र सोनवणे, अशोक सैंदाणे, दीपक पाटील, वंदना बाविस्कर, उत्तम चव्हाण, भरत शिरसाट, राकेश पाटील, प्रमोद बाविस्कर, चोपडा तालुक्यातील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष मंगेश चौधरी, जळगाव मुख्याध्यापक संघ सहविद्या सचिव सतीश पठार, जिल्हा परिषद व खासगी प्राथमिक, माध्यमिक, इंग्रजी विभाग सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पंचायत समिती शिक्षण विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

विवेकानंद विद्यालयाचे तंत्रस्नेही कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी साक्षरतेवर आधारित ४० चौरस फुटाची रांगोळी साकारत गीतगायन केले. तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापकांनी ग्राऊंडवर एकत्र उभे राहून साक्षरतेचा लोगो तयार करत समाजातील निरक्षर लोकांनी साक्षर होण्याबाबत संदेश दिला. मुख्याध्यापकांनी असा लोगो तयार करणारा महाराष्ट्रातील चोपडा पहिला तालुका आहे. याची संकल्पना व डिझाईन राकेश विसपुते यांनी केली. त्यांना संजय बारी, व्ही. डी. पाटील, अनुज बडगुजर यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Inauguration of International Literacy Day Week in Chopda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.