धक्कादायक! उधारीच्या १३० रुपयांसाठी तरुणाचा खून; निर्घृण हत्येनं परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 00:29 IST2022-05-06T00:29:07+5:302022-05-06T00:29:22+5:30
पानटपरीवर असलेल्या उधारीवरून तरुणाची निर्घृण हत्या; संशयित आरोपी फरार

धक्कादायक! उधारीच्या १३० रुपयांसाठी तरुणाचा खून; निर्घृण हत्येनं परिसरात खळबळ
जळगाव: उधारीच्या १३० रुपयांसाठी गुप्तांग पिळून तरुणाचा खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना ऐनपूर ता. रावेर येथे गुरुवारी रात्री ८ वाजता घडली.
भिमसिंग जगदीश पवार (२८ ) असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पन्नालाल कोरकू (५५) याची गावात पानटपरी आहे. त्याची पवारकडे १३० रुपयांची उधारी होती. यावरुन गुरुवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी कोरके याने पवार याचे गुप्तांग पिळले. यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती. संशयित आरोपी पसार झाला आहे.