जळगावमध्ये जबरी चोरी करून पळाला, पण पोेलिसांच्या हाती लागला
By विजय.सैतवाल | Updated: August 28, 2023 17:42 IST2023-08-28T17:41:51+5:302023-08-28T17:42:00+5:30
पथकाने सोमवारी संशयित शेख शाकीब याला भुसावळ शहरातून अटक केली.

जळगावमध्ये जबरी चोरी करून पळाला, पण पोेलिसांच्या हाती लागला
जळगाव : चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार शेख शाकीब शेख दाऊद (२१, रा. जाम महोल्ला, भुसावळ) याला स्थानिक गुन्हे शाखेने भुसावळ शहरातून अटक केली.
चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित शेख शाकीब हा भुसावळ शहरात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस हवालदार लक्ष्मण पाटील, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, महेश सोमवंशी यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सोमवारी संशयित शेख शाकीब याला भुसावळ शहरातून अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.