जळगावात राष्ट्रवादीकडून किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
By विलास.बारी | Updated: July 18, 2023 20:14 IST2023-07-18T20:13:44+5:302023-07-18T20:14:25+5:30
तसेच भाजपकडून सोमय्या यांना बडतर्फ करण्याचीही मागणी करण्यात आली.

जळगावात राष्ट्रवादीकडून किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता आकाशवाणी चौकात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. तसेच किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओ क्लिपची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली. तसेच भाजपकडून सोमय्या यांना बडतर्फ करण्याचीही मागणी करण्यात आली.
या आंदोलनात किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील, महानगरप्रमुख अशोक लाडवंजारी, युवक महानगराध्यक्ष रिंकु चौधरी, महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील, सहकार जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, राजू मोरे, रमेश पाटील, किरण राजपूत, भगवान सोनवणे, शालिनी सोनवणे, वर्षा राजपूत, कला शिरसाठ, आशा येवले, प्रमोद पाटील, अशोक सोनवणे, रमेश बेहरे, साहिल पटेल ,ललित नारखेडे, कुंदन सूर्यवंशी, चेतन राजपूत, आकाश हिवाळे, सचिन साळुंखे, योगेश साळी, हितेश जावळे, रितेश महाजन, पंकज तनपुरे, भाला तडवी, मतीन सय्यद, अबिद खान, विशाल देशमुख आदी उपस्थित होते.