मंत्री गुलाबराव पाटील यांना ‘दे धक्का’; शिंदे सेनेला केवळ सहा, मविआला मिळाल्या अकरा जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 14:17 IST2023-04-30T14:07:04+5:302023-04-30T14:17:23+5:30
गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील या निकालाने शिंदे गटाला हादरा बसला आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांना ‘दे धक्का’; शिंदे सेनेला केवळ सहा, मविआला मिळाल्या अकरा जागा
जळगाव - येथील बाजार समितीत पालकमंत्री गुलाबाराव पाटील यांना ग्रामीण मतदारांनी धक्का दिला आहे. शिंदे सेनेला केवळ सहा तर माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला अकरा जागा मिळाल्या आहेत.एक जागा अपक्षाने राखली आहे.
गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील या निकालाने शिंदे गटाला हादरा बसला आहे. विशेष म्हणजे,या तालुक्यात पालकमंत्र्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता.त्यामुळे ही निवडणुक त्यांच्यादृष्टीने प्रतिष्ठेची बनली होती. मात्र ग्रामीण मतदारांनी गुलाबरावांना साफपणे नाकारत दुसऱ्या गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाला संधी दिली आहे. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील धरणगावमध्ये गुलाबराव पाटील यांना सत्ता मिळविता आली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या एका डोळ्यात अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू, असेच चित्र जळगाव ग्रामीण मतदारसंघात आहे.