भुसावळमध्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे दुमजली इमारत कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 18:44 IST2024-08-25T18:44:02+5:302024-08-25T18:44:17+5:30
सुदैवाने यात कुठलीही जीविहानी झालेली नाही.

भुसावळमध्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे दुमजली इमारत कोसळली
वासेफ पटेल,भुसावळ (जि. जळगाव) : पावसामुळे भुसावळ येथील साई चंद्रनगर येथील दुमजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या इमारतीला तडे पडल्याचे लक्षात येताच यात राहणारे तीनही कुटुंबातील सदस्य बाहेर पडले होते. त्यामुळे ते बचावले आहेत.
भुसावळमध्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे दुमजली इमारत कोसळली pic.twitter.com/0CTNB5mNib
— Lokmat (@lokmat) August 25, 2024
ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजता घडली. सुदैवाने यात कुठलीही हानी झालेली नाही. भुसावळात काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. शहरातील यावल रोडलगत असलेल्या साईचंद्र नगर येथील दुमजली इमारत होती. या इमारतीला तडे पडले होते. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने सकाळी यात राहणाऱ्या तीनही कु टुंबातील सदस्यांना सकाळीच घर सोडण्यास सांगितले होते. त्यानुसार ही मंडळी बाहेर पडली होती.