शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 17:11 IST

चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण यांनी केली पिकांची पाहणी

चाळीसगाव : ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळे काढणाºया अवकाळी पावसाने गेल्या दहा दिवसांपासून चाळीसगाव परिसरात तंबूच ठोकला आहे. पावसाची संततधार असल्याने खरीप हंगाम मातीमोल झाला असून नवनिर्वाचित आमदार मंगेश चव्हाण यांनी सोमवारी खडकी बुद्रुक भागातील बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. नुकसानीचे सरसकट व तत्काळ पंचनामे करा. जलद गतीने मदत देखील पोहचवा, अशा सूचनाही त्यांनी महसूल विभागाला दिल्या आहेत. ‘लोकमत’ने देखील बळीराजाची व्यथा ठळकपणे मांडून पंचनामे होत नसल्याची कैफियत थेटपणे मांडली होती.गेल्या दहा दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले उत्पन्न वाया गेले असल्याने अस्मानी संकट उभे राहीले आहे.ज्वारी, बाजरी, मका अश्या पिकांना कोंब फुटले असून मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. शेतात पाणी साचल्याने कपाशीचे पीकही सडत आहे.ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर हे संकट बळीराजापुढे उभे ठाकले आहे. झालेला खर्च सुद्धा निघणार नाही. नुकसानीची तीव्रता अशी भयावह असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकºयांना या संकटातून सावरण्यासाठी कोणताही कसूर ठेवणार नसल्याचे सांगत मंगेश चव्हाण यांनी पालकमंत्री गिरीष महाजन व जिल्हाधिकारी यांना माहिती दिल्याचे यावेळी सांगितले. पीक विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकºयांना तत्काळ विमा क्लेम अदा करावा. याबाबत जिल्हाधिकाºयांना विनंती केली.त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाºयांनी संबंधित प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. लवकरच होणाºया अधिवेशनात नुकसानग्रस्त शेतकºयांना जास्तीत जास्त प्रमाणात मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.