९ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास वैजापूर, ता. चोपडा येथील बैल बाजाराच्या आवारात निर्दयतेने अवैधरीत्या गोऱ्हेची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एका गाडीतून १२ गोऱ्हे खाली उतरवून गाडी उभी होती. पोलिसांना पाहून त्या गाडीचा चालक फरार झाला तर दुसऱ्या महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिकअप चारचाकी वाहनात (एमपी ४६ जी ०६४८) अमानुषपणे १० गोऱ्हे कोंबून ठेवलेली गाडी उभी होती. गाडीतील १० व खाली उभे असलेले १२ गोऱ्हे असे एकूण लहानमोठे २२ गोऱ्ह्यांसह पिकअप वाहन असा एकूण ७ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
यावेळी पिकअप वाहनाचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा तपास करीत आहेत. पो. हे. कॉ. सुनील जाधव यांच्या फिर्यादीवरून वाहनांच्या फरार चालकांविरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहेत.