पारोळा शहरात अवैध दारू विक्रेत्यांवर धार, दीड लाखाचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:52+5:302021-07-14T04:19:52+5:30
पारोळा पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर, आज पोलीस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक ...

पारोळा शहरात अवैध दारू विक्रेत्यांवर धार, दीड लाखाचा माल जप्त
पारोळा पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर, आज पोलीस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक गोरे, उपविभागीय अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा शहराच्या हद्दीत देशी-विदेशी गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती. याबाबत कानोसा आणि सुगावा घेत पारोळा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड, हे. काँ. महेश पाटील, सत्यवान पवार, विनोद साळी, नाना पवार, राहुल पाटील, सुनील साळुंके यांच्या पथकाने पारोळा हद्दीत विविध ठिकाणी अवैध दारू व्यवसायावर करणाऱ्यांवर धाडी टाकल्या. त्यात देशी-विदेशी दारू जप्त केली व गावठी दारू नष्ट करण्यात आली. एकूण सुमारे १ लाख ५७ हजार रुपये इतकी होती. याबाबत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
120721\12jal_7_12072021_12.jpg
पारोळा शहरात अवैद्य दारू विक्रेत्यांवर धार, दीड लाखाचा माल जप्त