शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

पाऊस लांबल्यास चाऱ्याची बिकट स्थिती होणार - पालकमंत्र्यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:31 PM

प्रसंगी शेजारील राज्याची मदत घेणार

जळगाव : टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक लाख एकरवर चाºयाची लागवड करण्यात आली असून सध्या चाºयाची स्थिती बºयापैकी असली तरी पाऊस लांबल्यास बिकट स्थिती उद्भवू शकते, असे संकेत महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिले. यासाठी दक्षता म्हणून शेजारील राज्यांशी चर्चा केलेली असून अशी स्थिती उद्भवल्यास त्या राज्यांची मदत घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.चंद्रकांत पाटील हे शनिवारी दुष्काळी पाहणीसाठी जिल्हा दौºयावर आले असताना संध्याकाळी जिल्हा नियोजन भवन येथे पत्रकार परिषद झाली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी पाणी, चारा, गुरांच्या छावण्या, रोजगार, पिक कर्ज, पिक विमा या संदर्भात माहिती दिली.जिल्ह्यातील संस्था पुढे आल्यास छावण्या सुरु करणारदुष्काळामुळे राज्यात गुरांच्या १३०० छावण्या सुरू असून त्यात साडे नऊ लाख गुरे आहेत. मात्र जळगाव जिल्ह्यात एकही संस्था पुढे न आल्याने सरकारी छावणी नसल्याचे ते म्हणाले. यासाठी आतादेखील कोणत्या संस्था पुढे आल्यास छावणी सुरू करण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले. या सोबत गुरांसाठी देण्यात येणारे अनुदान ७० रुपयांवरून १०० रुपये प्रती जनावर करण्यात आले असून वेळ पडल्यास ते आणखी वाढविण्यात येईल, असेही ते म्हणाले.पावसाचा अंदाज घेत पाण्याचा वापरजिल्हा दौºयादरम्यान चाळीसगाव, पारोळा, अमळनेर या तीन तालुक्यातील नऊ गावांमध्ये जाऊन आपण पाहणी केली. यात फळबागांची स्थिती वाईट असल्याचे त्यांना मान्य करीत पिण्याचे पाणी, चारा यांची अधिक मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी लोक जे मागत आहे, ते आपण देत असल्याचाही दावाही त्यांनी केला. या सोबत जिल्ह्यात १९० गावांना १७१ टँकरद्वारे पाणी पुरविले जात असल्याचे सांगत पावसाचा अंदाज घेऊन पाण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. यात वाघूर धरणात पुरेसा जलसाठा असला तरी जून अखेरपर्यंत पाऊस येणार नसल्याचे हवामान खात्याने म्हटल्याने पाण्याची काटकसर केली जात असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.अमळनेर तालुक्यात पिक विम्याबाबत चौकशीचे आदेशशेतकऱ्यांच्या पिकांचा विमा काढल्यानंतर बाधीत शेतकºयांना नुकसान भरपाईचे वाटप केले जात असून यात ३२०० कोटी रुपये वाटप झाल्याचे पालकमंत्री पाटील म्हणाले. मात्र या संदर्भात अमळनेर तालुक्यात तक्रारी आल्या असून त्या संदर्भात चौकशीचेआदेशदिले असल्याचेही त्यांनीसांगितले.शेतकºयांच्या अनुदानातून रक्कम वजा केल्यास बँकांवर कारवाईशेतकºयांना कोरडवाहू, बागायती, फळबाग अनुदान ६७ लाख शेतकºयांना वाटप केले असून जिल्ह्यात पाहणी केलेल्या गावातून या बाबत एकही तक्रार नसल्याचे पालकमंत्री म्हणाले. या सोबतच दुष्काळी अनुदानाचे ३८६ कोटी ३८ लाख रुपये वाटप झाल्याचे ते म्हणाले. मात्र हे अनुदान बँका कृषी कर्जात वर्ग करीत असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला असता बँका शेतकºयांचे अनुदान अथवा पिक विम्याची रक्कम वजा करू शकत नाही, असे पालकमंत्र्यांनी सांगत तसे होत असल्यास व तशा तक्रारी आल्यास बँकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.जिल्हा बँकेचे चुकीचे धोरणशेतकºयांनी कर्जाची परतफेड केली तरी त्यांना जिल्हा बँक ५० टक्केच कर्ज देत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले की, ज्यांनी कर्जफेड केली आहे, त्यांना पूर्ण कर्ज मिळालेच पाहिजे, असे सांगत बँक जर ५० टक्केच कर्ज देत असेल तर ते चुकीचे असल्याचेही पालकमंत्र्यांनी मान्य केले. इतकेच नव्हे कर्ज माफीची तारीख व परतफेड या दरम्यानचे व्याज सरकार भरणार असल्याचे परिपत्रक असले तरी बँका त्यास जुमानत नसल्याच्या मुद्यावर बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकराची नोंद घेण्यात येईल व बँकांना सूचना देऊ.‘बीएचआर’प्रकरणी एसपींकडून माहिती घेणारभाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतपेढीतील गैरव्यवहार प्रकरणी पतपेढीची ईडीमार्फत चौकशी करण्यासोबतच पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फेही चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे का वर्ग झाला, याबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, या प्रकराची आपण पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव