हिंमत असेल तर राणे यांनी जळगावात सभा घेऊन दाखवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:21 IST2021-09-06T04:21:06+5:302021-09-06T04:21:06+5:30

चोपडा, जि. जळगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंमत असेल तर जळगावमध्ये येऊन जाहीर सभा घेऊन ...

If he has the courage, Rane should hold a meeting in Jalgaon | हिंमत असेल तर राणे यांनी जळगावात सभा घेऊन दाखवावी

हिंमत असेल तर राणे यांनी जळगावात सभा घेऊन दाखवावी

चोपडा, जि. जळगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंमत असेल तर जळगावमध्ये येऊन जाहीर सभा घेऊन दाखवावी, असे आव्हान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.

चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या विष्णापूर येथे आश्रम शाळेच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. नारायण राणे हे शिवसेनेवर करीत असलेल्या टीकेला मंत्री पाटील यांनी उत्तर दिले. यावेळी आमदार लता सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले की, विधानसभा आणि लोकसभा अशा कोणत्याही निवडणुकीचा अनुभव नसलेल्या उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले. बिना लायसन्सचे असल्यावरसुद्धा उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये ते नंबर एकवर आहेत, हे आम्ही सांगत नसून सर्व्हे सांगत आहे. तीन पायाच्या गाडीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ड्रायव्हर, मधे क्लीनर आणि मागे कंडक्टर असे तीन जण बसले आहेत. शरद पवार कंट्रोलर असताना बिना लायसेन्स ड्रायव्हर असूनही सरकार उत्तम हाताळत आहे. दोन वर्षांच्या कोरोना काळातही ठाकरे हे न घाबरता उत्कृष्ट सरकार चालवत आहेत.

आशिकचे घर नाशिक

जळगाव जिल्ह्याला तीन पालकमंत्री लाभले. त्यात सर्वप्रथम चंद्रकांत पाटील हे गेल्या सरकारमध्ये असताना पालकमंत्री होते. ते महिना दोन महिन्यातून जळगावला यायचे. त्यानंतर गिरीश महाजन हे आले. ते आशिक का घर नाशिक असे सांगताच श्रोत्यांमध्ये हंशा पिकला.

Web Title: If he has the courage, Rane should hold a meeting in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.