ओळख पटेना : रेल्वे स्टेशन नजीकची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:18 IST2021-03-25T23:17:42+5:302021-03-25T23:18:24+5:30
जळगाव : धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने २५ ते २७ वयोगटातील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव रेल्वे स्थानकावर मुंबई ...

ओळख पटेना : रेल्वे स्टेशन नजीकची घटना
जळगाव : धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने २५ ते २७ वयोगटातील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव रेल्वे स्थानकावर मुंबई मार्गाच्या आऊटर गुरुवारी पहाटे तीन वाजता घडली.
याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे तीन वाजता २५ ते २७ वयोगटातील हा तरुण आऊटरच्या दिशेने रस्ता ओलांडत असताना धावत्या रेल्वेचा त्याच्या डोक्याला फटका बसला. त्यात डोक्याचा पूर्णतः चेंदामेंदा झालेला आहे. त्यामुळे हा तरुण जागीच गतप्राण झाला. स्टेशन मास्तर कडून माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवला. दरम्यान, हा तरुण जळगाव शहरातीलच असल्याचे शक्यता आहे. मद्याच्या नशेत रस्ता ओलांडताना ही घटना घडली असावी आत्महत्येच्या दृष्टीनेही तपास केला जात आहे. मृतदेहाची ओळख पटल्यावरच अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. तरुणांच्या अंगात पिवळ्या रंगाचे शर्ट व जीन्स पॅन्ट आहे.ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.