महिला सबलीकरण करण्यातूनच देशाचा विकास शक्य- बोदवड येथे चर्चासत्रात मान्यवरांचे विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 19:40 IST2018-10-14T19:39:35+5:302018-10-14T19:40:41+5:30
राज्य महिला आयोग आणि बोदवड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आले. महिला सबलीकरण करण्यातूनच देशाचा विकास शक्य असल्याचे मान्यवरांनी या चर्चासत्रात सांगितले.

महिला सबलीकरण करण्यातूनच देशाचा विकास शक्य- बोदवड येथे चर्चासत्रात मान्यवरांचे विचार
बोदवड, जि.जळगाव : राज्य महिला आयोग आणि बोदवड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आले. महिला सबलीकरण करण्यातूनच देशाचा विकास शक्य असल्याचे मान्यवरांनी या चर्चासत्रात सांगितले.
‘ग्रामीण महिला : आरोग्य आणि सुरक्षा जनजागृती’ हा चर्चासत्राचा विषय होता. जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, राज्य महिला आयोगाचे जिल्हा सचिव अॅड.पीयूष गढे, बोदवडच्या नगराध्यक्षा मुमताज बी.सईद बागवान आणि बोदवड सार्वजनिक को.आॅप.सोसायटीचे अध्यक्ष मिठूलाल अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यास संस्थेचे उपाध्यक्ष अजय जैन, सचिव विकास कोटेचा यांच्यासह संस्थेचे संचालक, विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
चर्चासत्रात अंगणवाडी सेविका व आशा संस्थेच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
ग्रामीण भागतील महिलांचे जीवनमान उंचावणे व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी राज्य महिला आयोगाचे कार्य अभिनंदनीय आहे, असे नगराध्यक्षा साधना महाजन यांनी सांगितले. महिलांची कहानी मुलीच्या जन्मापासून सुरु होते आणि मृत्यूच्या शय्येवर संपते.
ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य व त्यांची सुरक्षा याबाबत जिल्हा न्यायालयाच्या अॅड.मंजू वाणी यांचे ‘हिंदू वारसा हक्क व कायदा १९५४’ या विषयावर व्याख्यान झाले.
‘महिला शारीरिक आजार’ या विषयावर बोदवड डॉ.वृषाली चौधरी यांनी मार्गदर्शन केले. पाचोरा येथील डॉ.अनुजा देशमुख सत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या.
‘महिलांचे मानसिक आजार, लक्षणे आणि उपाय योजना’ या विषयावर जळगाव येथील कीर्ती देशमुख यानी मार्गदर्शन केले. सत्राध्यक्ष म्हणून अशा संस्थेच्या पर्यवेक्षक दमयंती इंगळे होत्या.
चर्चासत्रासाठी प्रा.रत्ना जवरास, डॉ.अपर्णा चंद्रस, डॉ.कामिनी तिवारी, प्रा.हेमलता कोटेचा, प्रा. राजश्री चौधरी, प्रा.प्रतीक्षा धनगर प्रा.ज्योत्स्ना शिंदे, डॉ.रुपेश मोरे, डॉ.अनिल बारी, डॉ.मधू खराटे, डॉ.मनोज निकाळजे, बाबूराव हिवराळे, डॉ.व्ही.पी. चौधरी, डॉ. चेतन शर्मा, प्रा.नरेंद्र जोशी, प्रा.ईश्वर म्हसलेकर यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले.