उद्घाटनानंतर आयसीयू पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 13:01 IST2020-07-25T13:01:39+5:302020-07-25T13:01:49+5:30

जळगाव : कोविड रुग्णालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते अतिदक्षता विभागाचा कोनशिला अनावरण करण्यात आले तसेच या ठिकाणी पाहणीही करण्यात ...

ICU closed again after inauguration | उद्घाटनानंतर आयसीयू पुन्हा बंद

उद्घाटनानंतर आयसीयू पुन्हा बंद

जळगाव : कोविड रुग्णालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते अतिदक्षता विभागाचा कोनशिला अनावरण करण्यात आले तसेच या ठिकाणी पाहणीही करण्यात आली़ मात्र, त्यानंतर पुन्हा हा अतिदक्षता विभाग बंद करण्यात आला होता़ सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत तो बंदच होता़
रुग्णालयात अतिदक्षता विभागांची क्षमता वाढवून अत्यवस्थ रुग्णांना वेळेवर चांगले उपचार मिळावे, अशी व्यवस्था करण्यात येत आहे़ त्यातच दहा बेडच्या जुन्या अतिदक्षता विभागात नुतनीकरण करून त्या ठिकाणी त्याचा विस्तार करून १६ बेडचे प्रशस्थ आयसीयू तयार करण्यात आले आहे़
व्हेंटीलेटर्सचेही इंस्टॉलेशन बाकी असून ही प्रक्रिया झाल्यानंतर एक ते दोन दिवसात हा अतिदक्षता विभाग रुग्णांच्या सेवेत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सा.बां. विभागाची काही कामे रखडली आहे.

आक्षेप घेतलेले व्हेंटिलेटर
पीएम केअर फंडातून आलेल्या व्हेंटिलेटरवर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षय देवेंद्र मराठे यांनी आक्षेप नोंदविला होता. त्यामधून शंभर टक्के पुरवठा होत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. हेच आक्षेप असलेले व्हेंटिलेटर या नूतनीकरण करण्यात आलेल्या आयसीयूमध्ये बसविण्यात आले आहेत. कनेक्टरमुळे या व्हेंटिलेटरचा डेमो रखडला होता.

बेड कोंबले वॉर रूममध्ये
जुन्या आयसीमधून काढण्यात आलेले बेड हे आधी असलेल्या वॉररूममध्ये कोंबून ठेवण्यात आले आहेत़ सुरूवातीला ते बाहेरच पडलेले होते़ मात्र, उद्घाटनासाठी ते समोरील खोलीत ठेवण्यात आले आहे़

Web Title: ICU closed again after inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.