IAS Manoj Mahajan was honored at Pimpalgaon Hareshwar | आयएएस मनोज महाजन यांचा पिंपळगाव हरेश्वर येथे सत्कार
आयएएस मनोज महाजन यांचा पिंपळगाव हरेश्वर येथे सत्कार

ठळक मुद्देसंधीचे सोने करा, ध्येय निश्चित करास्पर्धा परीक्षेत यशस्वीतेसाठी हिम्मत खचू देऊ नकाआत्मविश्वास, सोशिकता ठेवा, एकत्र अभ्यास करा, चांगले मित्र-मैत्रिणी यांची संगत धरा. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आत्मविश्वास जिद्द, चिकाटी, परिश्रम घेतल्यास यश निश्चित मिळते

पाचोरा, जि.जळगाव : तालुक्यातील आय.ए.एस. झालेले पहिले मानकरी मनोज सत्यवान महाजन यांचा पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.
पी.एस.आय.पदी निवड झालेले पिंपळगाव हरेश्वर येथील स्वप्नील महाजन, रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त केलेले विनोद हटकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष पी.एस.पाटील होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष देवीदास महाजन, चिटणीस रवींद्र जाधव, माजी अध्यक्ष अर्जुन जाधव, संचालक डॉ.शांतीलाल तेली, मिलिंद देव, मोजुलाल जैन, राजेंद्र क्षीरसागर, दिवाकर बडगुजर, प्रदीप पवार, प्राचार्य सुनीता बडगुजर, बी.एच.चौधरी, विठ्ठल माळी, एम.जे.पांडे, उपप्राचार्य के.एम.बडगुजर, पर्यवेक्षक पी.एस.महाजन होते.
करिअरसंदर्भात प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी करिअरच्या वाटा, क्षेत्र निवडताना आपली आवड, संधी, अनेक क्षेत्र करिअरसाठी आहेत, असे सांगितले. मनोज महाजन यांनी आपल्या मनोगतात स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आत्मविश्वास जिद्द, चिकाटी, परिश्रम घेतल्यास यश निश्चित मिळते. स्पर्धा परीक्षेत यशस्वीतेसाठी हिम्मत खचू देऊ नका. आत्मविश्वास, सोशिकता ठेवा, एकत्र अभ्यास करा, चांगले मित्र-मैत्रिणी यांची संगत धरा. विचारांची देवाण-घेवाण करा. छत्रपती व्हा. संधीचे सोने करा. ध्येय निश्चित करा, असे सांगत मनोज महाजन यांनी स्वत:चा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला.
पीएसआय स्वप्नील महाजन व विनोद हटकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.मनोज सोनवणे यांनी, तर प्रा.ज्योती चौधरी यांनी आभार मानले.

Web Title: IAS Manoj Mahajan was honored at Pimpalgaon Hareshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.