मला वाटले ‘ती’ उद्धटच - बुमराह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:20 IST2021-09-06T04:20:55+5:302021-09-06T04:20:55+5:30
पुजाराने उद्दिष्ट ठेवून फलंदाजी केली - इंझमाम नवी दिल्ली : भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा हा नेहमीच ६० ...

मला वाटले ‘ती’ उद्धटच - बुमराह
पुजाराने उद्दिष्ट ठेवून फलंदाजी केली - इंझमाम
नवी दिल्ली : भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा हा नेहमीच ६० चेंडूत २० धावा काढतो. मात्र, तिसऱ्या दिवशी त्याने एक विशिष्ट उद्दिष्ट ठेवून फलंदाजी केली आहे, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने व्यक्त केले. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्यात झालेल्या भागिदारीने इंग्लंडला बॅकफुटवर ढकलले आहे. त्यावर इंझमाम यांनी म्हटले की, ‘पुजारा आला आणि त्याने इंग्लंडला बॅकफुटवर ढकलले.’
इंग्लंडचा संघ २० बळी घेईल का - वॉन
लंडन : जेव्हा बॉल स्विंग होत नाही, तेव्हा इंग्लंडचे गोलंदाज २० बळी घेऊ शकतील का, असा प्रश्न इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने व्यक्त केला. चौथ्या कसोटीत ओव्हलमध्ये बॉल फारसा स्विंग होत नाही. त्यामुळे वॉन याने हा प्रश्न उपस्थित केला आहे. वॉन याने पुढे म्हटले की, स्विंग आणि सीमचा फारसा फायदा होत नाही. तुमच्याकडे ८० ते ८३ मैल प्रतितास वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. पण, भारताचे फलंदाज सध्या त्यांच्यासमोर खूपच सहजतेने खेळत आहेत. तसेच वॉन याने भारताच्या संघ संयोजनावरदेखील टीका केली आहे. त्याने म्हटले की, विराट विचार करत असेल, की जडेजाला अश्विनऐवजी खेळवल्यानंतर मी हसेन.’
कसोटीत अशीच खेळी करायची असते - गावस्कर
लंडन : भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने पहिल्यांदाच परदेशात कसोटीत शतकी खेळी केली आहे. त्याच्या या खेळीचे कौतुक भारताचे माजी सलामीवीर सुनील गावसकर यांनीदेखील केले आहे. त्यांनी म्हटले की, ‘एक उत्तम खेळी, त्याने अर्धशतक झळकावले. मग रोहितने मोकळेपणाने फटके लगावले. कसोटी क्रिकेटमध्ये अशीच धावसंख्या उभारायची असते.’