मी क्वाॅरंटाईन, पतीकडून माझी बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:17 IST2021-05-07T04:17:29+5:302021-05-07T04:17:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : प्रकृती खराब झाल्यामुळे समाजाच्या क्वाॅरंटाईन सेंटरमध्ये स्वत:ला क्वाॅरंटाईन करून घेतले होते, असे असताना पती ...

मी क्वाॅरंटाईन, पतीकडून माझी बदनामी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रकृती खराब झाल्यामुळे समाजाच्या क्वाॅरंटाईन सेंटरमध्ये स्वत:ला क्वाॅरंटाईन करून घेतले होते, असे असताना पती तथा उद्योजक सत्यनारायण बाल्दी यांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची खोटी तक्रार नोंदवून माझी बदनामी केली, असे पत्र समाजसेविका राजकुमारी बाल्दी यांनी एमआयडीसी पोलिसांकडे दिले आहे.
४ एप्रिल रोजी प्रकृती खराब झाल्यामुळे ५ एप्रिल रोजी आपण उपचारासाठी दाखल झालो. त्यावेळी कोरोनाचा अहवालही पॉझिटिव्ह आला. अशा काळात सर्वच बाधित रुग्णांचे नातेवाईक प्रत्यक्ष भेटून फोनवर चर्चा करून मनोधैर्य वाढवण्याचे काम करीत आहेत. मलादेखील इतरांकडून चौकशी करुन धीर दिला जात आहे तर दुसरीकडे पतीकडून मला प्रचंड मानसिक त्रास दिला आहे. माझ्याविरुद्ध हरवल्याची खोटी तक्रार करण्यामध्ये पतीचे मोठे षडयंत्र असल्याचेही राजकुमारी बाल्दी यांनी तक्रारीत नमूद केले आहे.