शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

मीच माझा भाग्यविधाता -युपीएससी उत्तीर्ण अनिकेत सचान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 4:17 PM

म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग सापडेल, स्वत:वर विश्वास असेल तर जग जिंकणे मुश्किल नाही, असाच प्रत्यय भुसावळच्या प्रथम प्रयत्नात अवघ्या २२व्या वर्षी यूपीएससीच्या परीक्षेत २८५ रँक मिळवून अनिकेत सचान याने युपीएससीची परीक्षा पास केली व ‘मीच माझा भाग्यविधाता’चा प्रत्यय सिद्ध केला आहे. कुठलीही ट्यूशन वा क्लास न लावता इंटरनेटचा सदुपयोग करून अनिकेतने हे शिखर गाठले.

ठळक मुद्देट्यूशन न लावता इंटरनेटचा सदुपयोग करून पहिल्याच प्रयत्नात गाठले शिखरभुसावळच्या अनिकेत सचान यांनी

वासेफ पटेलभुसावळ : म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग सापडेल, स्वत:वर विश्वास असेल तर जग जिंकणे मुश्किल नाही, असाच प्रत्यय भुसावळच्या प्रथम प्रयत्नात अवघ्या २२व्या वर्षी यूपीएससीच्या परीक्षेत २८५ रँक मिळवून अनिकेत सचान याने युपीएससीची परीक्षा पास केली व ‘मीच माझा भाग्यविधाता’चा प्रत्यय सिद्ध केला आहे. कुठलीही ट्यूशन वा क्लास न लावता इंटरनेटचा सदुपयोग करून अनिकेतने हे शिखर गाठले.भुसावळ येथील १५ बंगला भागात राहणारे रेल्वे कर्मचारी तिकीट निरीक्षक विनयकुमार सचान यांचे चिरंजीव तसेच मंजुषा सचान सरल, सभ्य व सुसंस्कृत आईने दिलेले संस्कार यातून घडून वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी अनिकेत हा अगदी पहिली वर्गापासून पाऊल टाकत होता. भुसावळ येथील केंद्रीय विद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. दहावीत ९५ टक्के, तर बारावीत ९६.२ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण आयआयटी बीएचयु वाराणसी येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करता करताच यूपीएससीच्या अभ्यासालाही सुरुवात केली होती. सन मे २०१९ मध्ये इंजिनीरिंगची परीक्षा दिल्यानंतर जून ते सप्टेंबर २०१९ फक्त चार महिने घरच्या घरी इंटरनेटचा सदुपयोग अभ्यासासाठी करून सचिनने युपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी उत्तीर्ण केली.आयएएस अधिकारी स्वप्न पाहणाऱ्यांसाठी दिले तीन मूलमंत्रसर्वप्रथम ‘होय, मी करू शकतो’ स्वत:मध्ये असा आत्मविश्वास निर्माण करा. जो काही अभ्यास आपण करत आहोत त्याच्या आपल्या भाषेत स्वत:च नोट्स बनवा, अभ्यासानंतर त्या विषयाचा स्वत: वारंवार अंतिम परीक्षेसाठीचीच परीक्षा देत आहात अशा पद्धतीने, चाचणी परीक्षा देत चला. तसेच कोणत्याही एका विषयावर अभ्यास करताना एकाच स्त्रोतचा वापर करा. अनेक स्त्रोत वापरल्यास यामुळे गोंधळ निर्माण होतो. हे तीन मूलमंत्र अनिकेत सचान यांनी आयएएसचे स्वप्न पाहणाºया विद्यार्थ्यांना दिले.टी.एन.शेषन यांच्याकडून घेतली प्रेरणामाजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांची काम करण्याची पद्धत पाहता, त्यांची प्रेरणा घेऊन अभ्यास सुरू ठेवल्याचे सचान यांनी सांगितले.वडिलांचा प्रामाणिकता व आईचे संस्कार यातून घडलोवडील विनयकुमार सचान हे तिकीट निरीक्षक असताना त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. याशिवाय आई मंजुषा सचान यांनी संस्कार दिले. यामुळे खºया अर्थाने घडलो. लहानपणी वडिलांनी मी कलेक्टर, आयएएसची परीक्षा पास करून मोठा अधिकारी होणार याचे स्वप्न बघितले होते व आज वडिलांची स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद गगनात मावेनासा असल्याचे सांगितले.बहुतांश तरुण विद्यार्थी हे इंटरनेटचा चुकीच्या कामासाठी उपयोग करतात, मात्र इंटरनेटचा सदुपयोग केल्यास आपणास बारकाईने अभ्यास होऊ शकतो हे सचान यांनी सिद्ध करून दाखवलेदरम्यान, अधिकारी झाल्यानंतर देशातील शैक्षणिक व्यवस्था सुदृढ करून ग्रामीण भागाच्या विकासाकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Studentविद्यार्थीBhusawalभुसावळ