जळगाव जिल्ह्यातील मनवेल येथे बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 21:53 IST2018-03-15T21:53:02+5:302018-03-15T21:53:02+5:30
मनवेल (ता.यावल) येथील शुभांगी भगवान पाटील (वय १८) या बारावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी साडे सात वाजता घडली. बारावीची परीक्षा सुरु आहे व फक्त एकच पेपर बाकी असताना शुभांगी हिने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जळगाव जिल्ह्यातील मनवेल येथे बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१५ : मनवेल (ता.यावल) येथील शुभांगी भगवान पाटील (वय १८) या बारावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी साडे सात वाजता घडली. बारावीची परीक्षा सुरु आहे व फक्त एकच पेपर बाकी असताना शुभांगी हिने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याबाबत जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडे सात वाजता शुभांगी ही तिच्या खोलीत संस्कृत या विषयाचा अभ्यास करीत होती. अचानक तिने साडीने गळफास घेतला. हा प्रकार आई व वडीलांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने तिला ग्रामस्थ व नातेवाईकांच्या मदतीने जळगाव येथे हलविण्यात आले, मात्र रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली. जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी शुभांगीला मृत घोषीत केले.
चोपडा येथे आत्याकडे शिक्षण
शुभांगी ही चोपडा येथे आत्याकडे शिक्षण घेत होती. महात्मा गांधी महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी होती. परीक्षा काळात काही दिवसाच्या अंतरात पेपर असल्याने ती मनवेल येथे येत होती. पेपरच्या एक दिवस आधी ती चोपडा येथे जायची. शनिवारी संस्कृतचा पेपर असल्याने ती घरीच होती. शुभांगी हिने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. बारावीच्या परीक्षेच्या तणावामुळे आत्महत्या केली असावी अशी एक शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली