शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
2
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
3
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
4
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
5
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
6
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
7
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
8
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
9
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
11
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
12
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
13
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
14
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
15
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
16
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
17
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
18
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
19
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
20
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

बहिणीला मिठी मारल्याने केला तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:15 IST

संशयित ताब्यात, खुनाचा गुन्हा दाखल

ठळक मुद्दे मृत तरुण नशिराबादचा रहिवाशी

जळगाव : बहिणीला मीठी मारल्याने संतापलेल्या भावाने अमजद खान खलील खान पठाण (२९, रा.बारादरी मोहल्ला, नशिराबाद) या तरुणाला बेदम मारहाण केली व त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता फुपनगरी-कानळदा या कच्च्या रस्त्यावर घडली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रामचंद्र कडू मरसाळे (२४, रा.फुपनगरी, ता.जळगाव) यास अटक करण्यात आली आहे.मालवाहू वाहनावर अमजद पठाण हा चालक होता. त्याचा मित्र अफसर अली मुन्साफ अली (३३, रा. नशिराबाद) याला घेऊन रविवारी दुचाकीने (क्र.एम.एच.१९यु.७१७३) फुपनगरी गावाकडे गेला होता. तिथे फुपनगरी गावातून कानळदाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक तरुण व अमजद यांच्यात वाद झाले. त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. नंतर या मारहाण करणाºयाने आपल्यालाही धमकी दिली, अशी माहिती अफसर याने पोलिसांना दिली.या घटनेनंतर पोलिसांनी रामचंद्र याला ताब्यात घेतले. तसेच प्रत्यक्ष घटना पाहणारा पद्माकर राजाराम सपकाळे व रामचंद्र याची बहिण सोनी (नाव बदलेले) हिलाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. सोनी हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती, तिची मुलगी व भावाची मुलगी असे तिघं जण कानळदा रस्त्याकडे गेले होते. अमजद व एक जण दुचाकीवरुन तिथे आले. ‘तु तो नशिराबाद की है, इधर कैसे आयी’ असे म्हणत मीठी मारली.अचानक झालेल्या या प्रकारामुळे आपण समोरच असलेल्या भावाला आवाज दिला. तो तेथे धावत आला व त्यांच्यात झटापटी झाली, मारहाणीच्यावेळी अफसर हा लांब अंतरावर गुरांजवळ उभा होता, असेही तिने चौकशीत सांगितले.जिल्हा रुग्णालयात तणावअमजद याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर नशिराबाद व जळगाव येथील नातेवाईकांनी धाव घेतली. त्यावेळी काही जणांकडून न्याय मिळाला नाही तर बदला घेण्याची भाषा केल्याने तणाव निर्माण झाला होता. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी रुग्णालय गाठून सदर प्रकाणी मारेकºयाला ताब्यात घेण्यात आले आहे.यावेळी त्यांनी या घटेबाबत खूनाचा गुन्हा दाखल होणार आहे, त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नका किंवा अफवा पसरवू नका असे आवाहन केले. त्यानंतर रुग्णालयातीली गर्दी कमी झाली. सायंकाळी तालुका पोलीस स्टेशनलाही गर्दी झाली होती.सोनीचे सासर नशिराबादया घटनेतील सोनी हिचे माहेर फुपनगरी तर सासर नशिराबाद आहे. ५ रोजी पतीशी वाद झाल्याने सोनी माहेरी आली होती. एक वर्षापूर्वी देखील अमजद याने अंगलट केली होती,असे सोनी हिने पोलिसांना सांगितले.दरम्यान, अमजद हा मामा कलीम खान यांच्या मालवाहू वाहनावर चालक होता. त्याच्या पश्चात आई सुगराबाई, पत्नी संजीदाबी, मुलगा अय्यान, अबुबकर, भाऊ शकील खान असा परिवार आहे.या घटनेमुळे गावात चांगलीच खळबळ माजली असून दिवसभर याच घटनेची गावकºयांमध्ये चर्चा होती.मारणाºयानेच नेले दवाखान्यातअमजद याला छातीत व डोक्यावर बुक्क्यांनी जबर मारहाण केल्यानंतर तो जागीच कोसळला. बेशुध्दावस्थेत पाहून रामचंद्र घाबरला. त्याने अफसर याच्या मदतीने दुचाकीवर कानळदा येथे डॉक्टरांकडे नेले. तो मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याला कानळदा येथे सोडून त्याला जळगावला दवाखान्यात घेऊन जा असे अफसरला सांगून पलायन केले, ही माहिती स्वत: रामचंद्र व अफसर या दोघांनी पोलिसांना दिली. दरम्यान, गावात एका ठिकाणी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहायक निरीक्षक गणेश चव्हाण, उमेश भांडारकर, हेकॉ. ईश्वर लोखंडे, जितेंद्र पाटील, अजीज तडवी यांनी रामचंद्र याला ताब्यात घेतले.अफसर व अमजदने खोटी माहिती दिली...घटनास्थळावर जेव्हा वाद होत असताना तुम्ही कोण व इथे कशासाठी आलात अशी चौकशी रामचंद्रने केली असता आम्ही तांबापुरा येथील असून खाटीक आहोत. बकºया घेण्यासाठी आल्याचे सांगितले. गावातून जात असताना अमजद हा दोन ते तीन वेळा मोबाईलवर बोलला. या गावात आपल्या गावातील सोनीला भेटायचे आहे, असे तो सांगत असल्याचे अफसर याने पोलिसांना चौकशीत सांगितले.