शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

महामार्गाचा आणखी एक बळी... कंटेनरच्या धडकेत हॉटेल कारागीर जागीच ठार, रात्री ११ वाजेनंतर वाहतूक दोन तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 1:42 AM

दोन तास मृतदेह जागेवरच पडून

जळगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत बाळू देविदास पाटील (३५, रा. देवपिंप्री, ता. जामनेर, ह.मु. मण्यारखेडा, ता. जळगाव) या हॉटेलवरील कारागिराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री ११ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगाव-भुसावळ मार्गावर दूरदर्शन टॉवरजवळ झाला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.बाळू देविदास पाटील हा कालिंका माता चौकात लयभारी नावाच्या चायनीजच्या गाडीवर कारागिर होता. रात्री ११ वाजता काम आटोपल्यानंतर दुचाकीने (क्र.एम.एच.१९ डी.एफ.८८२०) घरी जात असताना दूरदर्शन टॉवरजवळ मागून येणाºया कंटेनरने दुचाकीला धडक दिली. त्यात बाळू पुढच्या चाकात चिरडला गेला. याच वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील जळगावहून नशिराबादला जात असताना अपघात पाहून थांबले. त्या वेळी लालचंद पाटील व पोलिसांमध्ये वाद झाला.संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला होता. अखेर १२.४० वाजता आंदोलक महामार्गावरुन उठले. १२.४५ वाजता रुग्णवाहिकेत मृतदेह टाकून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. यावेळी दोन्ही बाजूंनी तीन कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. 

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव