शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

१० हजार हेक्टरवरील फळबागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 12:01 IST

९ हजार ७० शेतकऱ्यांचे नुकसान, झाडे पिवळी पडू लागली

ठळक मुद्देदुष्काळाचा दाह 

जळगाव : दुष्काळाचा फटका जिल्ह्यातील फळबागांनाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सुमारे ४० हजार हेक्टरवरील फळबागांपैकी १० हजार हेक्टरवरील फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यापैकी ७८३४ शेतकºयांच्या ८ हजार ७९६ हेक्टरवरील फळबागांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून अनेक बागा सुकून गेल्या आहेत.जिल्ह्यात यंदा सरासरीच्या जेमतेम ६७ टक्केच पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५ टक्के कमीच पाऊस झाल्याने यंदा जलस्त्रोतांमध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यात १५ पैकी १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरीत २ तालुक्यांमध्येही दुष्काळीच परिस्थिती आहे. भर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरूच होते. तर पावसाळा संपताच टँकरची संख्या वाढू लागली आहे.पिण्याच्या पाण्याची अशी परिस्थिती असल्याने फळबागांची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याअभावी फळबागा सुकून गेल्या आहेत. तर काही ठिकाणी झाडे पिवळी पडत चालली आहेत.१२३८ हेक्टरवर ३३ ते ५५ टक्के नुकसानजिल्ह्यातील १२३६ श्ोतकºयांचे सुमारे १२३८ हेक्टरवरील फळबागांचे ३३ ते ५० टक्के नुकसान झाले आहे. त्यात पाचोरा तालुक्यात ४९७ हेक्टर, चाळीसगाव २९८ हेक्टर, जामनेर १२२ हेक्टर, भडगाव ३६ हेक्टर, मुक्ताईनगर ५४ हेक्टर, बोदवड २९ तर जळगाव तालुक्यात २०२ हेक्टरवर नुकसान झाले आहे.अनेक बागा वाळल्याजिल्ह्यात केळीचे क्षेत्र वगळून सुमारे ४० हजार हेक्टरवर फळबागा आहेत. त्यात प्रामुख्याने मोसंबी, डाळींब, लिंबू, सिताफळ, आंबा आदी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. मात्र दुष्काळामुळे पाण्याअभावी अनेक बागा जळून गेल्याचे चित्र दिसून येत आहेत. त्यामुळे कृषी विभागातर्फे या बागा वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले जात आहे.८७९६ हेक्टरवर ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानजिल्ह्यातील ७८३४ शेतकºयांच्या ८७९६.८७ हेक्टरवरील फळबागांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात भुसावळ तालुक्यात २८७ हेक्टर, बोदवड ४१, यावल ४३, मुक्ताईनगर ६०, अमळनेर ३९७ हेक्टर, चोपडा ४३५ हेक्टर,पारोळा ३७८.९२ हेक्टर, चाळीसगाव २९८८ हेक्टर, जामनेर २४४ हेक्टर, पाचोरा ८८१ तर भडगाव तालुक्यात ३०४२ हेक्टरवरील फळबागांचे ५० टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ