भयंकर! सात्रीत पाच सिलिंडर्सचा स्फोट; सात ते आठ घरे जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 23:16 IST2025-04-02T23:15:13+5:302025-04-02T23:16:08+5:30
स्फोटानंतर अमळनेर येथून अग्निशमन दलाची दोन वाहने पोहचली आहेत . काही वेळाने धरणगाव, चोपडा, पारोळा येथूनही अग्निशमन दलाची वाहने सात्रीत दाखल झाली. या आगीमुळे गावकरी हादरले आहेत.

भयंकर! सात्रीत पाच सिलिंडर्सचा स्फोट; सात ते आठ घरे जळून खाक
चंद्रकांत पाटील
अमळनेर ( जि. जळगाव) : चार ते पाच सिलेंडर्सच्या स्फोटामुळे सात्री ता. अमळनेर गाव पूर्णपणे हादरुन गेले. या स्फोटामुळेआग लागून सात ते आठ घरे जळून खाक झाली. घोंघावणाऱ्या वादळामुळे आग पसरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. आगीची ही भीषण घटना बुधवार दि. २ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
सात्री येथे रात्री आठ वाजेच्या सुमारास एका खळ्याला अचानक आग लागली. या खळ्याच्या शेजारी असलेल्या एका घरात चार ते पाच गॅस सिलिंडर होते. आग या सिलिंडरपर्यंत पोहचून त्याचा एका पाठोपाठ एक करुन स्फोट झाला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गावच हादरुन गेले.
स्फोटानंतर अमळनेर येथून अग्निशमन दलाची दोन वाहने पोहचली आहेत . काही वेळाने धरणगाव, चोपडा, पारोळा येथूनही अग्निशमन दलाची वाहने सात्रीत दाखल झाली. या आगीमुळे गावकरी हादरले आहेत. तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. प्रांताधिकारी नितीन मुंडावरे हे लक्ष ठेऊन आहेत.
रस्ता नसल्याने वाहन फसले
दरम्यान, या गावाला जाण्यासाठी तापी नदीतूनच रस्ता आहे. अमळनेरहून निघालेले अग्निशमन दलाचे वाहन या नदीतील वाळूत फसले. शेवटी जेसीबी लावून हे वाहन बाहेर काढावे लागले. त्यानंतर ते सात्री गावात पोहचले.
दिवसभरात आगीचा दोन घटना
अमळनेर तालुक्यात बुधवारी आगीच्या दोन घटना घडल्या. दुपारी अंबर्षी टेकडीवर तर रात्री सात्री येथे आग लागली.