चोपडा डी.फार्मसी महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST2021-09-12T04:20:36+5:302021-09-12T04:20:36+5:30
चोपडा : शरदचंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी डी.फार्मसी येथे गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या महाविद्यालयाचा निकाल ९७ ...

चोपडा डी.फार्मसी महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार
चोपडा : शरदचंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी डी.फार्मसी येथे गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
या महाविद्यालयाचा निकाल ९७ टक्के लागला असून, द्वितीय वर्षात शेख सुमैय्या कनिज अख्तर अहमदने ९०.२ टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रणाली गणेश कासार आणि अभिजित संजय भदाणे यांनी अनुक्रमे ८८.५ टक्के व ८६.४ टक्के गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेला आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा आशा पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, संचालक डी. बी. देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पंकज वळवी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
110921\img-20210911-wa0072.jpg
सत्कार करतांना सचिव डॉ स्मिता पाटील,शेजारी अध्यक्ष ऍड.संदीप पाटील,संचालक श्री. डी.बी.देशमुख आदी