रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्तीतर्फे ‘सन्मान गुरुवर्यांचा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:21 IST2021-09-06T04:21:02+5:302021-09-06T04:21:02+5:30

भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्तीच्या वतीने शिक्षकदिनी सहा तालुक्यातील २१ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. ...

'Honor Guruvarya' by Rotary Club of Bhusawal Tapti | रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्तीतर्फे ‘सन्मान गुरुवर्यांचा’

रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्तीतर्फे ‘सन्मान गुरुवर्यांचा’

भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्तीच्या वतीने शिक्षकदिनी सहा तालुक्यातील २१ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष डॉ. संजू भटकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार संजय सावकारे, उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, सोसायटीचे माजी अध्यक्ष तुकाराम बोरोले, सेक्रेटरी जीवन महाजन, सन्मान गुरुवर्यांचा कार्यक्रमाचे समन्वयक योगेश इंगळे, सहसमन्वयक प्रदीप सोनवणे आदी उपस्थित होते.

प्रारंभी दीपप्रज्वालन करून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर प्रा. आर. बी. इंगळे यांनी ईशस्तवन सादर केले.

सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी तर आभार प्रदीप सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एम. आर. चौधरी, प्रशांत नरवाडे, राहुल सोनार, समाधान जाधव, मीना नेरकर, मनीषा पाटील, माजी नगरसेवक राजू आवटे, डॉ. वंदना वाघचौरे, बापू चौधरी यांनी परिश्रम घेतले.

यांचा झाला गौरव

जिल्हा परिषद विभाग

नारायण विठ्ठल कुंभार (कोळन्हावी, ता. यावल), विजय रामगिर गोसावी (कुसुंबे, ता. रावेर), रवींद्र पांडुरंग चिंचपुरे (शेवगे पिंपरी, ता. जामनेर), रामचंद्र शंकर काळे (वाकी, ता. बोदवड), दीपाली बापू पाटील (साकरी, ता. भुसावळ), ममता सिकंदर तडवी (काहूरखेडे, ता. भुसावळ), गणेश यशवंत कोळी (चिंचखेडे बुद्रूक, ता. मुक्ताईनगर), काजी एजाजुद्दीन खलीलुद्दीन (यावल).

माध्यमिक विभाग

नितीन भास्कर झांबरे (अ.ध. चौधरी विद्यालय व ज्युनियर कॉलेज डोंगर कठोरा, ता. यावल), विजय राजकुमार मंगलानी (आर.एस.आदर्श हायस्कूल, भुसावळ ), सुभाष रामदास महाजन (सरदार जी.जी. हायस्कूल ॲण्ड ज्यु.कॉलेज, रावेर), हेमंत सुधाकर देशपांडे ( शिवाजी हायस्कूल, मुक्ताईनगर), सुरेंद्र अशोक पाटील (गो.द. ढाके विद्यालय, एनगाव, ता. बोदवड), सुरेश आनंदा सुरवाडे (न्यू इंग्लिश स्कूल, जामनेर), खासगी प्राथमिक विभाग जियाउन्नबी मोहिबुर रहमान शेख ( अलहिरा उर्दू प्राथमिक शाळा, भुसावळ), राजकुमार लीलाचंद जैन (श्री शिवप्रतिष्ठान रावेर संचलित सरस्वती विद्यामंदिर, रावेर), ज्ञानेश्वर हरिदास चौधरी (राष्ट्रीय शिक्षण संस्था, बोदवड )

महाविद्यालय विभाग

प्रा. डॉ. अविनाश एन. सोनार (व्ही. एस. नाईक कॉलेज, रावेर), प्रा.नंदन वसंतराव वळींकार (अ.ध. चौधरी विद्यालय व ज्युनियर कॉलेज, डोंगरकठोरे, ता. यावल), डॉ. प्रा. भाग्यश्री शैलेंद्र भंगाळे (पी.ओ. नाहाटा कॉलेज, भुसावळ)

Web Title: 'Honor Guruvarya' by Rotary Club of Bhusawal Tapti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.