पितृपक्षापूर्वीच गृहप्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:18 IST2021-09-11T04:18:44+5:302021-09-11T04:18:44+5:30

कोरोनामुळे बदलला कल, मागणीत वाढ कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या साधनांद्वारे प्रवास करण्यापेक्षा स्वत:सह कुटुंबाच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले जात असल्याने ...

Homecoming before the patriarchy | पितृपक्षापूर्वीच गृहप्रवेश

पितृपक्षापूर्वीच गृहप्रवेश

कोरोनामुळे बदलला कल, मागणीत वाढ

कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या साधनांद्वारे प्रवास करण्यापेक्षा स्वत:सह कुटुंबाच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले जात असल्याने प्रवासासाठीदेखील स्वत:च्या वाहनाला पसंती दिली जात आहे. त्यामुळे यंदा कोरोना व त्यामुळे विविध क्षेत्रांवर परिणाम असतानाही चारचाकी वाहनांच्या मागणीत वाढ असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यासोबतच फिजिकल डिस्टन्सिंगकडेही लक्ष द्यावे लागत असल्याने स्वत:च्या दुचाकीला पसंती वाढत आहे. सोबतच कोरोनामुळे स्वत:च्या घरांचे महत्त्व अधोरेखित झाल्याने घरखरेदीला पसंती दिली जात आहे. एकूणच कोरोनामुळे प्रत्येकाचा कल बदलून सुरक्षितता, गुंतवणूक याला महत्त्व दिले जात आहे.

यंदा पाऊस चांगला असल्याने हंगाम चांगला येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे घरांना पसंती वाढत आहे. तसेच कोरोनामुळे स्वत:च्या घराचे महत्त्व सर्वांनाच पटले असल्याने घर खरेदीकडे कल वाढत आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरांचे चांगेल बुकिंग आहे.

- अनिश शहा, सहसचिव, राज्य क्रेडाई.

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चारचाकींना चांगली राहिली. आमच्याकडे २०० चारचाकींची बुकिंग असून त्या पैकी ९० चारचाकींची शुक्रवारी डिलिव्हरी दिली. कोरोनामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने चारचाकींना मागणी वाढली आहे.

- उज्ज्वला खर्चे, व्यवस्थापक, चारचाकी विक्री दालन

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. हा मुहूर्त साधण्यासाठी दुचाकींची चांगली नोंदणी झाली. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगच्या दृष्टीने दुचाकींना मागणी वाढली आहे.

- अमित तिवारी, महाव्यवस्थापक, दुचाकी विक्री दालन.

Web Title: Homecoming before the patriarchy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.