चारचाकीची दुचाकीला मागून धडक ; दुचाकीस्वार रेल्वे कर्मचा-याचा जागीचं मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 12:19 IST2021-05-13T12:19:12+5:302021-05-13T12:19:40+5:30
जळगाव : भुसावळ-नशिराबाद रस्त्यावर चारचाकी व दुचाकी वाहनाचा अपघात होवून दुचाकीस्वार रेल्वे कर्मचा-याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरूवारी सकाळी ...

चारचाकीची दुचाकीला मागून धडक ; दुचाकीस्वार रेल्वे कर्मचा-याचा जागीचं मृत्यू
जळगाव : भुसावळ-नशिराबाद रस्त्यावर चारचाकी व दुचाकी वाहनाचा अपघात होवून दुचाकीस्वार रेल्वे कर्मचा-याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरूवारी सकाळी घडली. रामा भादू शिरोळे (५७,रा.अष्टविनायक कॉलनी, भुसावळ) असे मयत रेल्वे कर्मचा-याचे नाव आहे.
भुसावळ येथील रहिवासी रामा शिरोळे हे दुचाकीने (क्र.एमएच.१९.सीएम.७९३) सकाळी नशिराबादच्या दिशेने जात होते. माउली पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला मागून भरधावर येणा-या चारचाकी वाहनाने (एमएच.१९,बीयू.८९८८) जोरदार धडक दिली. धडक एवढी जबर होती की, शिरोळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच, नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, पोलीस कर्मचारी प्रवीण हाके, किरण बाविस्कर, संतोष केदार आदींनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. तसेच मृतदेह रूग्णालयात हलविला. तसेच शिरोळे यांचा मुलगा ज्ञानेश्वर हा देखील घटनास्थळी दाखल झालेला होता.