शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल प्रकरणाच्या ठळक घडामोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 16:01 IST

२७ जानेवारी २००६- तत्कालिन आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी शहर पोलीस स्टेशनला ४५ पानांची इंग्रजीत फिर्याद दिली. त्यानुसार आजी, माजी ...

२७ जानेवारी २००६- तत्कालिन आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी शहर पोलीस स्टेशनला ४५ पानांची इंग्रजीत फिर्याद दिली. त्यानुसार आजी, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक व ठरावाला मतदान करणाऱ्या ९० जणांविरुध्द कलम १२० ब, ४६८, ४०९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.२८ डिसेंबर २०११- रोजी घरकूल घोटाळ्याच्या तपासाला वेग आल्याने तत्कालिन नगराध्यक्ष सिंधुताई कोल्हे, पुष्पा पाटील, चत्रभुज सोनवणे व लक्ष्मीकांत चौधरी यांची अटकपूर्व जामीनासाठी धाव.२९ डिसेंबर २०११- तत्कालिन नगराध्यक्ष सिंधुताई कोल्हे, पुष्पा पाटील, चत्रभुज सोनवणे व लक्ष्मीकांत चौधरी या तिघांचा जामीन अर्ज फेटाळला.२८ जानेवारी २०१२- उच्चाधिकार समितीचे सभापती प्रदीप रायसोनी, खान्देश बिल्डरचे मेजर वाणी, राजा मयूर व मुख्याधिकारी पी.डी.काळे यांना अटक.१ फेब्रुवारी २०१२- माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी, चत्रभुज सोनवणे यांची चौकशी.२ फेब्रुवारी २०१२- तत्कालिन नगराध्यक्ष गुलाबराव देवकर यांची तब्बल एक तास चौकशी.१७ फेब्रुवारी २०१२- माजी नगरसेवक विजय वाणी यांनी तपासाधिकारी ईशू सिंधू व फिर्यादी डॉ.प्रवीण गेडाम यांच्याविरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली.२० फेब्रुवारी २०१२- प्रदीप रायसोनी, राजा मयूर, मेजर वाणी, पी.डी.काळे यांचा जामीन फेटाळला.१० मार्च २०१२- आमदार सुरेशदादा जैन यांना जळगाव पोलिसांनी धरणगाव येथे रात्री ११.५० वाजता ताब्यात घेऊन मध्यरात्री १.३० वाजता अटक केली.११ मार्च २०१२- अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.एस.दीक्षित यांनी आमदार सुरेशदादा जैन यांना १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.२६ मार्च २०१२- प्रदीप रायसोनी, राजा मयूर, मेजर वाणी यांचा जामीन औरंगाबाद हायकोर्टाने फेटाळला तर मुख्याधिकारी पी.डी.काळे यांना जामीन मंजूर.१७ मे २०१२- पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह ४६ जणांना नोटीस व १९ मे रोजी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश.१९ मे २०१२- पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचा पोलिसांना चकवा. दुपारी तब्बेत खराब असल्याने आपण नंतर हजर होऊ असा पोलीस अधीक्षक कार्यालयात फॅक्स पाठविला.२१ मे २०१२- पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये हजेरी. पोलिसांनी अटक करीत त्यांना न्यायालयात हजर केले. त्यांच्यासह १९ संशयितांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.४ जुलै २०१२- औरंगाबाद खंडपीठाने पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना १८ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले.१८ जुलै २०१२- औरंगाबाद खंडपीठात पालकमंत्री देवकर यांची दांडी. न्यायालयाने कामकाजासाठी २० जुलै ही तारीख दिली.२० जुलै २०१२- हायकोर्टाने घरकूल प्रकरणात सादर केलेल्या आरोपपत्राची प्रत सादर करण्याचे आदेश दिले.२७ जुलै २०१२- पोलिसांनी पालकमंत्री देवकर यांच्या अटकेनंतर न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्ट उच्च न्यायालयात सादर केला.३१ जुलै २०१२- न्यायालय सुटीवर असल्याने पालकमंत्री देवकर यांच्या विरोधातील याचिकेवरील निर्णय आठवडाभरानंतर.२ सप्टेबर २०१६- सुरेशदादा जैन सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.४ सप्टेबर २०१६- सुरेशदादा जैन यांचे धुळे कारागृहातून सुटका झाल्यानंतर जळगाव शहरात आगमन

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव