यावल येथे चंदनाचे लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 19:18 IST2019-06-27T19:16:56+5:302019-06-27T19:18:04+5:30

यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर पेट्रोल पंपामागील मोकळ्या जागेत थांबलेल्या उतारूंकडून चंदनाच्या लाकडाचे ठोकळे गुरुवारी जप्त करण्यात आले.

Here's the sandalwood seized | यावल येथे चंदनाचे लाकूड जप्त

यावल येथे चंदनाचे लाकूड जप्त

ठळक मुद्देदोघांवर गुन्हा दाखलसंंशयित मध्य प्रदेशातील

यावल, जि.जळगाव : शहरातील फैजपूर रस्त्यावर पेट्रोल पंपामागील मोकळ्या जागेत थांबलेल्या उतारूंकडून चंदनाच्या लाकडाचे ठोकळे गुरुवारी जप्त करण्यात आले. वनविभागाने त्यांच्याकडून १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, पिता-पुत्रास अटक केली आहे.
पोलीस गस्तीवर असताना उतारूंची चौकशी केली असता ते चंदनाच्या लाकडाचे ठोकळे विक्री करणारे असल्याचे सांगितल. यावरून पोलिसांनी वनक्षेत्रपाल विशाल कुटे, व्ही.एम.पाटील यांना कळविले. त्यांनी तातडीने ढुबराज छोटूलाल पारधी व रुबीतलाल ढुबराज पारधी (दोन्ही रा.हरदुवा, जि.कटनी, म. प्र.) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ११ किलो ५८८ ग्रॅम चंदनाच्या लाकडाचे जप्त केले.
दोघा पिता-पुत्रावर वनकायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक प्रकाश मोराणकर, सहायक वनसरंक्षक मधुकर नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Here's the sandalwood seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.