शंभर विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 19:13 IST2019-09-23T19:12:59+5:302019-09-23T19:13:27+5:30
जळगाव - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने सोमवारी जी़डी़ बेंडाळे महाविद्यालयात हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी शिबिर घेण्यात आले़ यामध्ये १०० ...

शंभर विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी
जळगाव- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने सोमवारी जी़डी़ बेंडाळे महाविद्यालयात हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी शिबिर घेण्यात आले़ यामध्ये १०० विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तर १४३ विद्यार्थिनींची रक्तगट तपासणी करण्यात आली़
यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नगरमंत्री सोहम पाटील, जी.डी.बेंडाळे ज्युनिअर महाविद्यालय उपप्राचार्य प्रा.सुनीता पाटील, महाविद्यालय अध्यक्ष हिमानी महाजन, गोळवलकर रक्तपेढीच्या उज्ज्वला पाटील, कार्यक्रम प्रमुख वनिता पाटील आदींची उपस्थिती होती़ कार्यक्रमात प्रा़ सुनीता पाटील यांनी मार्गदर्शन केले़ त्यात त्यांनी ापले आरोग्य चांगले असेल तरच आपण कोणतेही कार्य व्यवस्थित करू शकू़ त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, व्यायाम व मैदानी खेळ खेळावेत असे त्यांनी सांगितले़ अभाविप मांडणी महानगर सहमंत्री पूनम पाटील यांनी केली. विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम व उपक्रमा आयोजित करते त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी लढणारी जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे़ त्यामुळे आपण विद्यार्थी परिषदेत सक्रीयतेने कार्य करावे असे मत नगरमंत्री सोहम पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हिमानी महाजन यांनी केले़ यावेळी अभाविप कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.