वीज कंपनीतील मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंंबियांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 18:17 IST2018-07-31T18:16:57+5:302018-07-31T18:17:06+5:30
कर्तव्य बजावत असताना विजेचा धक्का लागून झाला होता मृत्यू

वीज कंपनीतील मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंंबियांना मदत
/>
चाळीसगाव : तरवाडे (पेठ) येथील वीज वितरण कंपनीतील कर्मचारी दीपक सोनार यांचे दोन महिन्यांपूर्वी कर्तव्य बजावत असताना विजेचा धक्क्याने निधन झाले.
अतिशय हलाकीच्या परिस्थित जगणाºया त्यांच्या परिवाराला शहरातील सराफ व्यापारी सोमनाथ सराफ, विशाल सराफ, राजू बाविस्कर, नानासाहेब वानखडे, बाळासाहेब वानखडे, भूषण भामरे, सुधीर मोरे आदींनी एकत्र येऊन पाच हजार रुपये मदत म्हणून दिले.
मंगळवारी मदतीचा धनादेश त्यांच्या कुटुंंबियांना देण्यात आला. यावेळी मयत दीपक सोनार यांची वृद्ध आई, पत्नी व तीन मुली उपस्थित होत्या. सामाजिक भावनेतून परिवाराला मदत केली असल्याचे या वेळी सोमनाथ सराफ यांनी सांगितले.